Saturday, February 21, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला जुने शहर पोलिसांनी केला 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला जुने शहर पोलिसांनी केला 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला दिव्य न्यूज : जुने शहरातील बायपास भागातील एका घरातून दिवसाढवळ्या चोरीला गेलेले लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करुन जुने शहर पोलीसांनी गुन्ह्यातील आरोपींनी जेरबंद केले. जुने शहर पोलीस स्टेशनच्या ह‌द्दीतील बायपास येथील सागर कॉलनीत राहणारे नेहा सावदेकर यांच्या घरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

वाशिम बायपास येथील सागर कॉलनी येथे राहणाऱ्या नेहा राजेश सावदेकर (वय ३०) दुपारच्या सुमारास घरासमोरच असलेल्या गवई यांच्या घरी काही कामानिमीत्त गेल्या होत्या.काहीवेळा नंतर घरी परत आल्यावर त्याच्या घरातून सोन्याचा नेकलेस (५२ ग्रॅम) सोन्याचे २ मोठे नेकलेस (४० ग्रॅम) सोन्याचे चेन व लॉकेट (१२ ग्रॅम)सोन्याचा ३ अंगठ्या (१५ ग्रॅम) सोन्याचे २ पोत(२० ग्रॅम) ब्रेसलेट (३ ग्रॅम) आणि लहान नेकलेस ( १८ ग्रॅम ) तसेच रोख रक्कम ९० हजार रुपये असा मुद्देमाल चोरी केला.अशी तक्रार दिली. यावरुन अप नंबर ३८६/२०२६ कलम ३०५ भा.न्यासं.चा गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले.

सदर गुन्ह्यात प्राथमिक तपासात कोणताही तांत्रिक पुरावा मिळाला नसल्याने गुन्हयातील संशयीत आरोपींनी उडवाउडवीचे उत्तरे देवुन तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु संशयित आरोपीचा हालचालीचा बारकाईने मागोवा घेतला असता सदर चोरी समिक्षा गवई हीने केल्याचा निष्कर्षाप्रत पोलीस पोहचले.दरम्यान मुर्तिजापूर तालुक्यातील हीरपूर येथील जुना प्रियकर ऋतीक अजाबराव श्रृंगारे (वय २२) याला गवईने अकोला येथे बोलवले होते. तो त्याचा मित्र समीर प्रदीप तेलखडे (वय १९) सोबतच अकोल्यात आला. तेव्हा समिक्षा गवई व तिचा साथिदार वैभव संजय गोपनारायण (वय २३) यांनी अकोला येथील चिवचिव बाजारात मुद्देमाल त्यांचा सुपुर्द केला. अशी गोपनीय माहिती मिळताच दोन्ही संशयित आरोपींचा पाठलाग करून तपास पथकाने कौशल्य वापरून सापळा रचुन अमरावती येथून ताब्यात घेतले.

त्यांना गुन्ह्याचा अनुषंगाने विचारपुस केली, तेव्ह गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली.आरोपींकडून तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सर्व दागिने ज्यांचे वजन अंदाजे १३८ ग्रॅम व चालु बाजार दराप्रमाणे अंदाजे २१ लाख रूपये व गुन्ह्यात वापरलेली मोटसायकल मिळून २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर चोरी समिक्षा अनिल गवई हीने केल्याचे निष्पन्न झाल्याने समिक्षा अनिल गवई व तिचे अन्य साथीदारांना सदर अटक करण्यात आली.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी, एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीन लेव्हरकर, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र करणकार, पोलीस अमलदार पंकज उपाध्याय, सागर शिरसाट, पवन डांबलकर, आशिष नांदोकार, श्रीकांत पवार, शेख असलम, गोपाल ठाकुर, महीला पोलीस अंमलदार निशा वाकडे, धनश्री सांगेवार यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!