Friday, February 20, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात डिजिटल अरेस्ट ! बॅक मॅनेजरची सजगता अन् वृद्ध खातेदार फसवणूकीपासून बचावले

अकोल्यात डिजिटल अरेस्ट ! बॅक मॅनेजरची सजगता अन् वृद्ध खातेदार फसवणूकीपासून बचावले

अकोला दिव्य न्यूज : आर्थिक फसवणूकीसाठी सायबर गुन्हेगारांनी टाकलेल्या ‘डिजीटल अरेस्ट’च्या जाळ्यात अलगतपणे अडकलेले अकोला येथील सेवानिवृत्त शिक्षक ५ लाखरुपयांचा फसवणुकीने बॅक व्यवस्थापक व अधिकारी यांच्या सजगतेने बालबाल बचावले. या शिक्षकांकडे लक्ष दिले नसते आणि आरटीजीएस केले असते तर सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपये ओरबाडून घेऊन, कंगाल केले असते. सदर सेवानिवृत्त शिक्षकांचा मुलगा आयटी इंजिनिअर असून बंगळुरू येथे नोकरी करत आहे. या प्रकाराची माहिती त्यांना दिली आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

अकोला शहरातील जवाहर नगर चौक येथे जळगांव पीपल्स बँकेची अकोला शाखा असून या शाखेत राऊतवाडी भागात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त शिक्षकांचे एलआयसी ओव्हर ड्राफ्ट खाते आहे. सदर खात्यात अत्यंत कमी पैशांचा व्यवहार होतो. शेतीची कामे सुरू झाली की सदर खात्यातून खातेदाराकडून अधिकाधिक दोन लाख रुपयांची देवाणघेवाण केली जाते आणि शेतमाल विकून पैसे परत खात्यात जमा केली जाते.अशा पद्धतीने व्यवहार होत असलेल्या या खात्यात १८ फेब्रुवारीला दोन दिवसांपूर्वी खातेदार शिक्षक चक्क ५ लाख रुपयांचा आरटीजीएस करण्यासाठी आले व कर्मचाऱ्याला 5 लाख रुपयांचे आरटीजीएस करण्यासाठी चेक दिला.

यावेळी कार्यरत अधिकारी अनिकेत तंवर यांनी विचारपुस केली. तेव्हा आरटीजीएस खात्याबाबत सदर खातेदार योग्य प्रकारे माहिती देऊ शकले नाही आणि काहीसे घाबरले असल्याचे अनिकेतच्या लक्षात आले. तेव्हा शाखा व्यवस्थापक अमित पाथरकर यांची भेट करून दिली. शाखाधिकारी पाथरकर यांनाही खातेदार काहीतरी लपवत आहे. हे लक्षात आले. तेव्हा त्यांना धीर देऊन विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी सगळं काही सांगितले. त्यांनी एका बॅक खात्यातून अडीच कोटी रुपयांचा व्यवहार केला असून ते खाते दहशतवाद्यांच्या संबंधित आहे आणि यासाठी डिजिटल अरेस्ट केले आहे.पण सुटका करून घेण्यासाठी ५ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.अशी माहिती दिली.

ही चक्क फसवणूक असल्याचे पाथरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी खातेदाराला ही बाब समजवून सांगितली आणि सदर राष्ट्रीयकृत बँकेत घेऊन गेले. तेथील व्यवस्थापकांनी खातरजमा करून दिलेले खाते क्रमांक या बॅंकेच्या देशभरातील कुठल्याही शाखेचा नाही. हे लक्षात आणून दिले. तेव्हा जळगाव पिंपल्स बॅंकेचे खातेदार आणि सेवानिवृत्त शिक्षकाला मोठा दिलासा मिळाला. बँकेच्या खातेदारांची एकूण व्यवहार पद्धत, चेहऱ्यावरचे हावभाव आणि देहबोलीतून बॅक अधिकारी व व्यवस्थापक यांना आलेली शंका अखेर खरी ठरली.

अलिकडच्या काळात सायबर क्राईममधून होणाऱ्या फसवणुकीची माहिती असल्याने आणि वयोवृद्धाना टार्गेट केले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन खातेदारास आपुलकी आणि धीर दिला. यामुळेच त्यांना फसवणूक होण्यापासून संरक्षण दिले. जळगाव पिपल्स बॅंकेच्या अकोला शाखेचे व्यवस्थापक पाथरकर यांनी घेतलेली खबरदारी, दक्षता इतरांना दिशादर्शक आहे. सर्वच बॅकांनी वयोवृद्ध आणि तरूण मुलामुलींच्या खात्यात होणा-या उलाढालीवर लक्ष केंद्रित केले तर अनेकजणांना आर्थिक फसवणूक होण्यापासून संरक्षण मिळेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!