Saturday, November 23, 2024
Homeसामाजिकबेडेकर लोणचेवाले अतुल बेडेकर यांनी ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बेडेकर लोणचेवाले अतुल बेडेकर यांनी ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बेडेकर लोणची, मसाले आणि पापड महाराष्ट्रात प्रचंड प्रसिद्ध आहेत. या खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले व्ही. पी. बेडेकर आणि सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं शुक्रवारी निधन झालं. मागच्या महिनाभरापासून ते आजारी होते. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील बेडेकर सदन या ठिकाणाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अतुल बेडेकर यांच्या निधनाचं वृत्त समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे.

“लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायात उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांची अभिरुची जपतानाच त्यात काळानुरुप बदल करून अतुल बेडेकर यांनी बेडेकर ब्रँडला वेगळे स्थान निर्माण करून दिले. शंभर वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या पारंपरिक स्वरुपाच्या व्यवसायास आपल्या प्रयोगशीलतेनं जागतिक ओळख निर्माण करून दिली. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणाऱ्या उद्योग समूहांपैकी असणाऱ्या बेडेकर उद्योग समूहाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली.

त्यांच्या निधनानं मराठी उद्योग जगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. मसाले, लोणचे, पापड, रेडी मिक्स इत्यादी बनवणारा बेडेकर समूह दिवंगत व्हीपी बेडेकर यांनी सुरू केला होता. १९१० मध्ये गिरगावमध्ये किराणा दुकान म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला पुढे तो वाढला. १०० वर्षांहून अधिक काळ लोणची, पापड आणि मसाले या क्षेत्रात बेडेकर कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!