Friday, February 13, 2026
No menu items!
No menu items!
Homeनंदलाल मानधने यांच निधन! उद्या शनिवारी अंत्यसंस्कार

नंदलाल मानधने यांच निधन! उद्या शनिवारी अंत्यसंस्कार

अकोला दिव्य न्यूज : जुन्या पिढीतील अडते व अडत्या मंडळाचे संस्थापक सदस्य व तत्कालीन अध्यक्ष तसेच माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक नंदलाल गंगाराम मानधने यांच आज शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. शहरातील धार्मिक क्षेत्रात कार्यरत व अडत व्यापारी अनिल मानधने यांचे ते वडील आणि कौस्तुभचे आजोबा आणि माहेश्वरी समाजातील सक्रिय मार्गदर्शक हरीश मानधने यांचे मोठे भाऊ आहे.

मुळचे बोरखेडी येथील नंदलाल मानधने यांनी अडत्या म्हणून आपल्या जीवनाला सुरुवात केली आणि सचोटीच्या व्यवहाराने नावलौकिक मिळविला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांच्या हितरक्षणास्तव सगळ्यांनी एकजूट होऊन स्थापन केलेल्या अडत्या मंडळाच्या संस्थापकांपैकी ते एक होते.दरम्यानच्या काळात अध्यक्ष म्हणून नंदलाल मानधने यांनी अडत्या व कास्तकार यांच्यासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगी होते. मात्र त्यांनी सदैव शेतकऱ्यांचा हिताची जोपासना केली. व्यवहार करताना सावधपणे बाजार समितीच्या नियमांचे पालन करण्यात कधीही कुचराई केली नाही. यामुळे अलिकडच्या काळापर्यंत त्यांचा नावाला आदराचे स्थान होते.

उद्या शनिवार १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहते निवासस्थान विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिराजवळ, सावंत वाडी, रणपिसे नगर येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आणि मोहता मील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

2

15:50

जगदीश मुंदडा

रमण हेडा

! शोक संदेश!

आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे

संदेश

0

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!