Saturday, February 7, 2026
No menu items!
No menu items!
Homeसंस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

अकोला दिव्य न्यूज : मारवाडी ब्राम्हण संस्कृत विद्यालयद्वारे संचालित संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलकिशोर हरितवाल तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अंकुश दिलीप खिडकर उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन नर्सरी ते दहावीच्या प्रवासातील सर्व आठवणींना उजाळा दिला.याप्रसंगी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरितवाल व मुख्याध्यापक खिडकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी जीवनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी श्रुती दुबे व प्रियंका काशलानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात शिक्षक संजय चव्हाण, वर्षा बोबडे, रंजना म्हैसणे, सुळे , मनीषा अंभोरे चित्रा इंगळे ,दीपशिका दामले, खुशी तिवारी, वर्षा एललकार, पल्लवी डोंगरे, नीलिमा शिरसाट, दक्षा मेहरे, ईशा क्षीरसागर, शारदा लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!