Homeहिदायत पटेल हत्याकांड ! संशयीत आरोपी अँड पटेलसह दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज

हिदायत पटेल हत्याकांड ! संशयीत आरोपी अँड पटेलसह दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज

अकोला दिव्य न्यूज : कॉग्रेसचे जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणी मोहाळा येथील रहिवासी संशयीत आरोपी अँड पटेल फाजील खाँ आसीफ खाँ (४०) आणि फारुख खान आसिफ खान पटेल (३९) यांनी आज ३१ जानेवारीला अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांच्या न्यायालयात अटकपुर्व जमानत अर्ज दाखल केला.आरोपी तर्फे आज अँड. जुबेर अहेमद अमरावती व अँड. व्ही.एस.लाखे यांनी उपरोक्त जमानत अर्ज दाखल केला आहे.

पटेल हत्याकांड प्रकरणातील तपास अधिकारी व अकोट उपविभाग सहायक पोलीस अधिक्षक निखील पाटील यांनी सरकारी वकील अजित देशमुख यांचे मार्फत जमानत अर्जाला लेखी उत्तर दाखल केले आहे.सदर जमानत अर्जावर ३ फेब्रुवारीला युक्तीवाद होऊन सुनावणी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासुन सर्व संशयित आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून महाराष्ट्रासह अकोला जिल्हयातील नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे.

अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. ०५/२०२६, कलम १०३(१),१०९,३ (५) भान्यासं. मधील संशयीत आरोपींमध्ये अँड.पटेल फाजील खाँ आसीफ खाँ आणि फारुख खॉ आसिफ खॉ पटेल या दोघांचाही समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular