Sunday, February 1, 2026
No menu items!
No menu items!
Homeतब्बल ९ पुरस्कारासह अकोल्याचे डॉ. मनोज अग्रवाल ठरले लॉयन्स बेस्ट प्रेसिडेंट

तब्बल ९ पुरस्कारासह अकोल्याचे डॉ. मनोज अग्रवाल ठरले लॉयन्स बेस्ट प्रेसिडेंट

अकोला दिव्य न्यूज : अकोल्यातील ख्यातनाम उद्योजक व वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मनोज अग्रवाल यांचा अकोला लॉयन्स इंटरनॅशनल अंतर्गत नुकत्याच भुसावळ येथे पार पडलेल्या रिजन एकच्या कॉन्फरन्सच्या शानदार सोहळ्यात लॉयन्स बेस्ट प्रेसिडेंट म्हणून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिजन चेअरमन डॉ उमाकांत चौधरी तर उद्घाटक म्हणून अश्वीनकुमार बाजोरीया आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रांतपाल राहुल ओरोकर, योगेश जयस्वाल, आय.पी.डी. जी. गिरीश सिसोदिया, प्रमुख वक्ता डॉ. सत्येंद्र शर्मा, कनव्हेनर डॉ.नरेंद्र भोलाने, सहकनव्हेनर किरण सरोदे आणि डॉ मनोज अग्रवाल व्यासपीठावर उपस्थीत होते.

या सोहळयात उल्लेखनीय काम करणा-या पदाधिका-यांचा अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये लॉयन्स क्लब अकोला मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. मनोज अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट ऑफ रिजन या सर्वोच्च अवार्डने सम्मानित आले तसेच इतर वेगवेगळे ९ पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. त्यामध्ये बेस्ट एमजेएफ अँत्रीशीऐलन अवॉर्ड, गट कॉनक्लेव अवार्ड, बेस्ट हंगर अॅक्टिविटी ऑफ रिजन (प्लॅटिनम) बॅस्केंटसर अॅक्टिव्हिटी ऑफ रिजन ( प्लॅटिनियम ), बेस्ट सिग्नेचर अॅक्टिव्हिटी ऑफ रीजन (हार्ट सर्जरी), बेस्ट मेम्बरशीप ग्रोथ ऑफ रिजन (सिल्वर), बेस्ट ह्यूमेनिटेरियन सर्विसेस ऑफ रिजन (गोल्ड), बेस्ट एलसीआईएफ प्रमोशन ऑफ रिजन (गोल्ड), बेस्ट रिजन को-कन्व्हिनीअर अवार्ड, बेस्ट जीएमटी अचीवमेंट ऑफ रिजन (गोल्ड) अवार्डने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये मानवता या विषयावर प्रमुख मान्यवरांनी माहिती दिली. प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरियांनी लॉयन्स इंटरनॅशनलच्या मिशन १.५ बहुल सखोल माहिती दिली. यामध्ये लॉयन्स सदस्यांची संख्या कशी वाढविता येईल त्या बद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये पाकिस्तानवरील ऑपरेशन सिंदूर व शहीद भगतसिंग नाट्य प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच लॉयन्स इंटरनॅशनल मध्ये बॅनर प्रझेंटेशनला मोठे महत्व आहे. या करिता वंदेमातरम व महाराष्ट्रातील संस्कृतीची थीम होती. त्या थीमनुसार बॅनर प्रेझेंटेशन झाले. झोन चेअरमन मुनीत जसवानी, शशी मुरारका, लॉयन्स कल्ब ऑफ अकोला मिड टाऊनचे सचिव प्रशांत फुलारी यांना देखील अवार्ड देऊन सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये डॉ. कैलाश मुरारका, सुभाष चांडक, घनश्याम जोशी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!