अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला पोलिस कार्यालयातील कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक यांनी संगनमताने स्वतःच्या अनुचित फायद्यासाठी इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप असलेली फौजदारी स्वरूपाची तक्रार एका पोलीस हेडकॉन्स्टेबलने खदान पोलिस स्टेशनमध्ये दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली होती. परंतु कारवाई झाली नाही. तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असेल तर सर्वसामान्यांनी अपेक्षा काय ठेवावी ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सद्यस्थितीत तक्रारीवर कारवाई झाली नसल्याने, सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आश्वासित प्रगती योजनेंतर्गत१०-२०-३० चा लाभ मिळवून देण्यासाठी, सार्वजनिक हिताचा कोणताही विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी काही पोलीस अंमलदारांची अनुकूलता दाखविण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांचा नुकसान करिता कार्यालय अधीक्षकांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप अधीक्षक व आस्थापना लिपिकविरुद्ध करीत पोलिस शिपाई संतोष नप्ते यांनी खदान पोलिसा ठाण्यात फौजदारी तक्रार केली आहे.
शेवटी या पोलिस कर्मचाऱ्याने थेट खदान पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. माहितीच्या अधिकारांमध्ये हे सर्व पुरावे प्राप्त झाल्यानंतर आणि १०-२०-३० महाराष्ट्र शासनाने आश्वासित प्रगती योजना अंतर्गत आदेश केल्यानंतर लोकसेवकाने वरिष्ठांच्या आदेशाचे व कायद्यातील तरतुदीचे पालन न करता फक्त ठराविक कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.
यामुळे आपला मानसिक छळ करून आर्थिक नुकसान व फसवणूक केली आहे. तेव्हा अस्थापना अधीक्षक व लिपीक यांच्या विरूध्द कलम १६६,१८८, ४६८,४७१, आणि ३४ च्या भादव प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी तक्रार हेड काँन्सटेबल संतोष भिमराव नप्ते यांनी पोलीस स्टेशन खदान येथे दिनांक ५ जानेवारी २४ रोजी दिली आहे.