अकोला दिव्य न्यूज : मारवाडी ब्राम्हण संस्कृत विद्यालय द्वारा संचालित निमवाडी येथील संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलकिशोर हरीतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून राजेन्द्र जोशी, देवकीनंदन शर्मा, मुख्याध्यापक अंकुश किरडकर उपस्थीत होते.

शाळेतील विध्यार्थ्यांनी विविध सुंदर नृत्य व देशभक्तीपर गीत सादर केले. राष्ट्रभक्ती वर आपले विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका पल्लवी डोंगरे व निलिमा बिरसात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात संजय चव्हाण, मनिषा अंभोरे, चित्रा इंगळे दिपशिका दामले, खुशी तिवारी, वर्षा एललकार , दत्ता मेहरे, ईशा क्षिरसागर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
