Monday, January 26, 2026
No menu items!
No menu items!
Homeउद्या लक्षात ठेवा ! बॅका बंदच ; कर्मचारी संपावर : खाजगी बॅंका...

उद्या लक्षात ठेवा ! बॅका बंदच ; कर्मचारी संपावर : खाजगी बॅंका सुरू

अकोला दिव्य न्यूज : लाँग विकेंड संपून आता लोक परतीच्या मार्गावर लागले आहेत. अशातच गेल्या चार दिवसांपासूनचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी उद्या, म्हणजेच २७ जानेवारीला बँकांमध्य गर्दी होणार आहे. परंतू, बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण उद्या हॉलिडे नसला तरी बँकांचे कामकाज बंद असणार आहे. पाच दिवसांच्या आठवड्यासाठी म्हणजेच दोन विकऑफसाठी बँकांचे लाखो कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या या देशव्यापी संपामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होऊ शकते. सलग सुट्ट्यांनंतर बँका उघडण्याऐवजी कर्मचारी संपावर जाणार असल्याने ग्राहकांच्या अडचणीत भर पडणार आहे. सध्या बँकांना दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते, परंतु कर्मचाऱ्यांची मागणी आहे की सर्व शनिवारी सुट्टी जाहीर करून आठवड्याचे ५ दिवसच कामकाज असावे. या मागणीवर सरकार आणि ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) कडून ठोस निर्णय न मिळाल्याने १० लाख कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

कोणत्या सेवांवर होणार परिणाम? 
रोख व्यवहार: बँकांच्या शाखा बंद राहिल्याने पैसे काढणे किंवा भरणे कठीण होईल. 
चेक क्लिअरन्स: कोट्यवधी रुपयांचे चेक क्लिअरिंग प्रक्रियेत अडकून पडू शकतात. 
एटीएम सेवा: सलग ३ दिवस सुट्ट्या (२४, २५, २६ जानेवारी) आणि त्यानंतर उद्याचा संप यामुळे एटीएममधील रोख रक्कम संपण्याची दाट शक्यता आहे. 
डिजिटल बँकिंग: नेट बँकिंग आणि युपीआय (UPI) सेवा सुरू राहतील, मात्र तांत्रिक बिघाड झाल्यास बँकांचे कर्मचारी उपलब्ध नसतील.

आम्ही दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहोत, परंतु आम्हाला ५ दिवसांचा आठवडा हवा आहे,” अशी भूमिका एआयबीईएने मांडली आहे. या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा यांसह सर्व सरकारी बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. खाजगी बँकांचे (उदा. HDFC, ICICI) कामकाज मात्र सुरू राहण्याची शक्यता आहे. आरबीआय (RBI) आणि एलआयसी (LIC) मध्ये आधीच ५ दिवसांचा आठवडा लागू आहे, तर मग सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरच अन्याय का? असा सवाल या संघटनेने केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!