अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अकोल्याच्या मतदारांनी कुठल्याही पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले नाही आणि सत्ता स्थापनेसाठी आवश्यक 41 ही सदस्य संख्येंची जमवाजमव करण्यासाठी सगळेच पक्ष जुंपले आहे. दरम्यान उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 च्या 6 नगर सेवक ‘नॉटरिचेबल’ असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही निखालस अफवा पसरवून संभ्रम निर्माण केले जाते आहे. असं उबाठा शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

उबाठाचे ६ ही नगरसेवक उबाठाचे आमदार देशमुख यांच्या संपर्कात असून, कुठल्याही आमिष किंवा दबावाला बळी न पडता सगळेजण एकत्रपणे व एकजुटीने ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सत्तास्थापनेसाठी आसुसलेल्यानी अफवा उठवून डाव साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा डाव उबाठा मोडीत काढून पक्षप्रमुखाच्या आदेशाचे पालन करणार आहे.अशी ग्वाही स्थानिक उबाठा शिवसेना नेते मुकेश मुरूमकर यांनी दिली आहे.
अकोला महापालिका निवडणुकीत उबाठाचे सागर भारूका, विजय इंगळे, अभय कुमार, दिनेश सरोदे,मनोज पाटील आणि शिल्पा वरोकार असे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ३८ उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र सत्ता स्थापनेसाठी काठावरचे बहुमतासाठी ४१ ही संख्या आवश्यक असल्याने भाजप कात्रीत सापडला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक युतीचे असल्याने ही संख्या ३९ वर पोहचल्यावर देखील पेच कायम आहे. दुसरीकडे कॉंग्रेस महाविकास आघाडीची देखील आवश्यक संख्या जुळवून घेण्यासाठी दमछाक होत आहे. पक्षाची विचारधारा व नैतिकता महत्वाची सत्ता ? हे दिसून येईलच.
