अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील सिंधी समाजाच्या प्रलंबित भाडे पट्ट्यांचे काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला जिल्हा दंडाधिकारी आणि अकोला उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. बऱ्याच काळापासून अकोल्यात प्रलंबित असलेल्या सोसायटीच्या भाडेपट्ट्यांच्या कामाला गती देण्यासाठी अकोला सिंधी समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. ना. बावनकुळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधून नवनिर्वाचित नगरसेवक हरीशभाई आलिमचंदानी यांचा देखील ना. बावनकुळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि केला आणि संपूर्ण पॅनल निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
वाहेगुरु सेवा समिती व अकोला सिंधी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाडेपट्टेसाठी निवेदन बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या सोसायटीच्या भाडेपट्ट्यांच्या कामाला गती देण्याची मागणी केली याव सिंधी जनरल पंचायतीचे माजी अध्यक्ष कन्हैयालाल रंगवानी, सुरेशकुमार संतानी, नगरसेवक हरीशभाई आलिमचंदानी, कोडुमल चावला, हरीश पारवानी, गिरधर पोपटानी आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
