अकोला दिव्य न्यूज : वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण सेवा प्रारंभ केल्यानंतर आज अनेक वर्षांनंतरही शांत, संयमी, सुस्वभावी, तेवढ्याच आपुलकीने माफक पैशात आणि अनेकदा मोफत औषधोपचार करण्याची परंपरा कायम ठेवण्याचा गुण वैशिष्ट्यांमुळे सर्वदूर परिचित डॉ आशिष पनपालिया यांनी प्रचारात केलेल्या आवाहनाला प्रभाग क्रमांक 6 च्या लोकांनी उघडपणे ‘तुम्ही नाही, आम्ही लढत आहोत’ असा प्रतिसाद दिल्याने यंदा या प्रभागात उद्या गुरुवार १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानातून येथील मतदार इतिहास घडवणारच्या ‘मुड’मध्ये आहे. असं सर्वंच जण सांगतात.

भंपकपणा बाजूला ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने व मोजक्या लोकांना सोबत घेऊन डॉ आशिष पनपालिया यांनी केलेल्या प्रचारानंतर प्रभागातील समस्यांचे निराकरण व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता विकासकामे करणारा माणूस, असं दस्तुरखुद्द मतदाराच सांगत असून जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं, जमिनीवरचं नेतृत्व म्हणजेच डॉ आशिष पनपालिया असं आज शेवटच्या दिवशीच प्रभागातील चित्र दिसत आहे.

वर्षानुवर्षांच्या वैद्यकीय क्षेत्रातून व सामाजिक कार्यातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या पनपालिया यांनी अवघ्या तीन आठवड्यात प्रभागातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात त्यांनी “काम करणारा उच्च विद्या विभुषीत तरुण” म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
मतदार हा सर्वसाधारणपणे पक्षाच्या विचारधारेवर मतदान करतो. मतदान करताना मतदार केवळ पक्ष व पक्ष चिन्ह बघून मतदान करतो. पक्ष नेतृत्वाला देखील हे माहिती असल्याने लोक भावनाकडे दुर्लक्ष करून उमेदवारी दिली जाते. अनेकदा लोकांना सक्षम पर्याय नसल्याने नाईलाजाने मत द्यावे लागते. मात्र योग्य पर्याय मिळाला की, मतदार सावध होतो. हीच बाब पनपालिया यांच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासून दिसून आली.

जनतेला प्राधान्य, विकासासाठी कटिबद्ध हे केवळ आश्वासन नाही तर ही आशिष पनपालिया यांची कार्यशैलीची ओळख असल्याचे लोकांना समजून आले. वडील नगरसेवक असताना घेतलेला अनुभव, प्रामाणिकपणा, ठोस निर्णयक्षमता या जोरावर प्रभागाचा विकास घडवण्याचा त्यांचा दृढ निर्धार असल्याचे लोकांना कळून चुकले.ही निवडणुकी केवळ महापालिकेत आपल्या प्रभागासाठी प्रतिनिधी निवडून देण्यासाठीची आहे. राज्यासाठी नाहीच, अशी गटागटाने चर्चा सुरू झाली आणि खोळंबलेल्या विकासाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मतदार शिट्टी वाजवून जागृती निर्माण करतं आहे.असं या प्रभागात फेरफटका मारताना दिसतंय.

