अकोला दिव्य न्यूज : महापालिका प्रभाग क्रमांक १२ मधील एक मोठा विभाग माजी महापौर भरगड आणि माजी नगरसेवक अजय शर्मा यांच्या जुन्या प्रभागातील असून दोघांनी आपल्या कार्यकाळात केलेली विकासकामे आणि जनसंपर्काने मदन भरगड यांच्या पत्नी संगिता भरगड यांचं खातं उघडून तर अजय शर्मा यांची विजयाची हॅट्रिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्षानुवर्षांच्या सामाजिक कार्यातून, प्रभागातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात त्यांनी आपली ओळख काम करणारा नेता म्हणून निर्माण केली आहे. यावेळी त्यांच्या पत्नी संगिता भरगड राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

तत्कालीन आमदार व अकोला शहरातील भाजपचे मोठे आधारस्तंभ असणारे स्वर्गीय आ. गोवर्धन शर्मा यांचं पाठबळ मिळून नगरसेवक झालेले अजय शर्मा सलग दोनदा विजयी झाले. आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेले शर्मा यांनी प्रभागातील विकासासाठी प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. यासोबतच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले.

नागरिकांच्या दीर्घकालीन गरजांचा विचार करून प्रभाग १२ मध्ये भूमिगत गटार बांधकाम वेगाने सुरू आहे. या कामामुळे सांडपाणी व्यवस्थेला शाश्वत उपाय मिळून स्वच्छता, आरोग्य आणि जीवनमान उंचावणार आहे.जनतेला प्राधान्य, विकासासाठी कटिबद्ध! हा फक्त नारा नाही, तर अजय शर्मा यांच्या कार्यशैलीची ओळख असल्याने प्रचाराच्या अंतिम चरणात दोघांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागातील मतदारांमध्ये आता निवड अनुभवाची… निवड विकासाची…अशी चर्चा सुरू झाली आहे.

