Wednesday, February 4, 2026
No menu items!
No menu items!
Homeप्रभाग 20 मध्ये माजी उपमहापौर मापारी आपल्या सहकारी उमेदवारांसह विजयाच्या उंबरठ्यावर !

प्रभाग 20 मध्ये माजी उपमहापौर मापारी आपल्या सहकारी उमेदवारांसह विजयाच्या उंबरठ्यावर !

अकोला दिव्य न्यूज : पहिल्यांदा नगरसेवक झाल्यावर आजपर्यंत शांत, संयमी, सुस्वभावी गुण वैशिष्ट्यांमुळे सर्वदूर परिचित आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रभागातील समस्यांचे निराकरण व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता विकासकामे करणारा माणूस, म्हणून मतदारांमध्ये ओळख निर्माण करणारे करणारे माजी महापौर विनोद मापारी आपल्या तीनही सहकारी उमेदवारांसह यंदाही विजयाची परंपरा कायम राखणार, असं प्रभागातील चित्र दिसत आहे.

अकोला महापालिका प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपा उमेदवार विनोद मापारी यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळेच ही निवडणूक त्यांना सहजसोपी आहे.अशी मतदारांची प्रतिक्रिया असून यावेळी त्यांच्या पॅनलमध्ये इतर तीन उमेदवार नवखे आहे.मात्र “आम्ही नव्हे,आपण लढतोय” अस घोषवाक्य घेऊन केलेल्या प्रचाराने त्यांनी आघडी घेतली.

माजी उपमहापौर मापारी यांचे सर्वच समाजात आणि सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याने, आम्हाला देखील प्रचारात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे या पॅनलमधील मंगेश जिने (अ), शारदा ढोरे (बंद) सोनाली अंधारे(क) यांनी सदर प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासून आघाडी घेतल्यानंतर प्रभाग क्रमांक 20 मधील प्रचारात खा. अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील प्रभागात सभा, पदयात्रा व भेटीगाठी घेऊन मापारी व इतर तीन उमेदवारांच्या विजयी मताधिक्यात वाढ केल्याची चर्चा आहे. विनोद मापरी आपल्या विजयाची हॅटट्रिक साधण्यासोबतच निवडणूक रिंगणात उतरलेल्या तीनही उमेदवारांना विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेले आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!