अकोला दिव्य न्यूज : स्वतः मतदारांनी विकासकामांना प्राधान्य देऊन, यंदा अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांची उमेदवारी उचलून धरली आणि आज मतदारांनीच काढलेल्या महारॅलीने संपूर्ण प्रभाग क्रमांक 13 ‘आशिष’मय झाला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी तरुणाईने आपल्या चेहऱ्यावर निवडणूक चिन्ह लाऊन पवित्रकार यांच्या विजयाची हॅटट्रिकचा एल्गार पुकारला आहे.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये यंदा आशिष पवित्रकार विजयाची हॅटट्रिक साधणार, असा विश्वास या प्रभागात व्यक्त केला जात असताना एक सर्वसमावेशक व अनुभवी चेहऱ्याला डावलल्याने येथील युवा आणि महिलांच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. सर्वजणानी कंबर कसून आता निवडणूक जिंकण्यासाठी झटत आहेत. ऐन वेळी भाजपला आशिष ‘नकोसे’ झाला असेल मात्र आम्हाला पाहिजे. सत्तेचा मनमानीला चाप लावण्यासाठी जेष्ठ नागरिक, युवक महिलासह मोठ्या संख्येने येथील मतदार एकजुटीने काम करत आहेत.

सर्वेक्षणांचे दाखले देत काही नगरसेवकांना तिकीट नाकारले गेले. विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कृत्ये केली म्हणून निलंबित केलेल्या काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. मग हा न्याय पवित्रकारसोबत का नाही? पवित्रकारच्या बाबतीत प्रभागात कुठेही कुठल्याही प्रकारची नाराजी नसतांना हे का? असा प्रश्न करून अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. संघटनात्मक काम, जनाधार व पक्षनिष्ठा या अनुषंगाने पवित्रकारवर कोणीही आरोप करू शकत नाही.असं मतदारच सांगत आहे आणि आज काढण्यात आलेली रॅली व त्यामध्ये मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी मतदारांचा कौल आणि ‘आशिष’ पवित्रकारच्या पाठीशी आहे. हे दिसून येते.

सध्यस्थितीत पवित्रकार यांनी केलेली विकासकामे, लोकसहभाग आणि सततचा जनसंपर्क या जोरावर आशिष पवित्रकार यांनी विजयाचा उंबरठ्यावर पाऊस ठेवले आहे. विरोधात असलेल्यांचा समोर सशक्त आवाहन निर्माण केले आहे. तिकीट वाटपातील आत्मघातकी धोरणाचा फटका मतदानाच्या दिवशी किती बसतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये पवित्रकारची स्थिती मजबूत असल्याची चर्चा शहरात आणि राजकीय वर्तुळात जोरावर आहे.
