अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका निवडणुकीचा प्रचार चरमशिगेवर पोहचला असून प्रचंड खार्चिक झालेली निवडणूक लढविणे सहज शक्य नाही. लवाजम्यासह ‘तामझाम’मध्ये अडकून पडलेल्या या निवडणुकीत बोटावर मोजता येतील एवढे नगण्य उच्च विद्या विभुषीत उमेदवार रिंगणात आहेत. अशा विपरीत परिस्थितीत आणि उमेदवाराच्या भाऊगर्दीत प्रभाग क्रमांक 6 मधून वैद्यकीय व्यावसायिक डॉ.आशिष चंद्रकांत पनपालिया सर्वसमावेशक व स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले, हेच मुळात मोठे धाडस आणि कळस म्हणजे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होणा-या फालतू खर्चाला फाटा देत एक आदर्श उदाहरण मतदारांसमोर ठेवले आहे.

अनेक वर्षांपासून सर्वसामान्य गरीब लोकांच्या वसाहतीत अत्यंत कमी पैशात उपचार आणि मरणोत्तर नेत्रदान, देहदान, रक्तदान, आरोग्य शिबीरे घेऊन सामाजिक कार्यात सक्रिय डॉ.आशिष पनपालिया यांनी निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय मुळात मोठे पाऊल आहे आणि ते देखील जात,धर्म,पंथ आणि गटातटाच्या राजकारणापासून दूर होऊन स्वतंत्रपणे ! तेव्हा अनेकांनी आपापल्या परीने विचार व्यक्त केले. मात्र ते आपल्या विचारांवर ठाम राहिले आणि सध्यस्थितीत होतं असलेल्या अवास्तव व खार्चिक प्रचाराला पुर्णपणे फाटा दिला. कुठल्याही लवाजम्याशिवाय, गोंगाट-गलबला वीना मोजक्या लोकांना सोबत घेऊन डॉ.पनपालिया यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला.

उमेदवारी अर्ज दाखल करताच, प्रभागात कोणत्या समस्या आहेत आणि त्या कशा दूर करणार, अत्यंत आवश्यक असलेली ड्रेनेज सिस्टीम, साफसफाई आणि दिवाबत्ती या सारख्या प्राथमिक सोयीसुविधांसोबतच प्राथमिक शिक्षण, आरोग्य केंद्र, व्यायाम शाळा, जेष्ठ नागरिक सभागृह, महिला प्रसाधन गृह, अंगणवाडी इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा वचननामा घेऊन प्रचार सुरू केला.

अगदी सुरूवातीला अशक्य वाटणारी गोष्ट पनपालिया यांनी आज शक्य करून दाखवले. जवळपास प्रत्येक घरात जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि फक्त वचननामा देत मतदाराला मतं देण्याचा हक्काचा योग्य वापर आणि अधिकार असलेल्या मुलभूत सुविधांसाठी विचार करण्यास बाध्य केले. आज संपूर्ण प्रभागात उच्च विद्या विभुषीत आणि आरोग्य व सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ता असलेले आशिष पनपालिया यांची आता एक सर्वोत्तम पर्याय म्हणून मतदारांमध्ये चर्चा होत आहे.

आज मोठ्या संख्येने लोकं पनपालिया यांच्या सोबत जोडले गेले. केवळ एक पॉम्लेट आणि प्रत्येक घराला भेट देवून ते एक कर्मठ, जिद्दीने काम करणारे, एकाकी झुंज देणारे कार्यकर्ता असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. प्रचाराची शिट्टी अशी वाजवली की घरादारात एकच गोष्ट होत आहे की, विषय पक्षाचा नाही, प्रामाणिक माणसाचा आहे. स्वतः मतदारचं आता डॉ.पनपालिया यांचा प्रचार करीत असल्याने यंदा चमत्कार होईल असे मत व्यक्त केले जात आहे.
