Wednesday, February 4, 2026
No menu items!
No menu items!
Homeमनपा प्रभाग १३ मध्ये समिकरण बदलणार ? पवित्रकारची उमेदवारी मतदारांनीच उचलून धरली

मनपा प्रभाग १३ मध्ये समिकरण बदलणार ? पवित्रकारची उमेदवारी मतदारांनीच उचलून धरली

अकोला दिव्य न्यूज : अनेक प्रभागांतील भाजप कार्यकर्ते संभ्रमात असून प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपसाठी धक्कादायक स्थिती निर्माण झाली असल्याचे दिसत आहे. लोकप्रिय, सक्रिय व जनाधार असलेले आशिष पवित्रकार यांची उमेदवारी नेमकी का कापण्यात आली ? हा प्रश्न खुद्द प्रभागातील मतदार उघडपणे विचारू लागले आहेत या नाराजीची ठिणगी ज्वालामुखी बनेल असा प्रभागातून सूर उमटत आहे. वरवर शांतता असली तरी आतून भाजपमध्ये देखील असंतोष खदखदत आहे. परिणामी राजकीय समीकरणे बदलण्याचे स्पष्टपणे संकेत दिसत आहेत.

महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात कथित ‘गुजरात पॅटर्न’ राबवत माजी सरचिटणीस, माजी सभापती, अनुभवी नगरसेवकांना थेट डच्चू देत आयाराम- गयारामांना संधी देण्याचा प्रयोग प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. प्रभागांत उघडपणे नाराजी उफाळून येत असून भाजपाचा डाव उलटून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्वेक्षणांचे दाखले देत निवर्तमान नगरसेवकांना तिकीट नाकारले गेले असले तरी आशिष पवित्रकारच्या बाबतीत कुठेही कुठल्याही प्रकारची नाराजी नसतांना हे का? असा प्रश्न करून अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत ‘संघटनात्मक काम, जनाधार व पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक समीकरणेच निर्णायक ठरली’ असा आरोप केला आहे.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये यंदा आशिष पवित्रकार विजयाची हॅटट्रिक साधणार, असा विश्वास या प्रभागात व्यक्त केला जात असताना एक सर्वसमावेशक व अनुभवी चेहऱ्याला डावलल्याने येथील युवा आणि महिलांच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. सर्वजणानी कंबर कसून आता निवडणूक जिंकण्यासाठी झटत आहेत. ऐन वेळी भाजपला आशिष ‘नकोसे’ झाला असेल मात्र आम्हाला पाहिजे. सत्तेचा मनमानीला चाप लावण्यासाठी जेष्ठ नागरिक, युवक महिलासह मोठ्या संख्येने येथील मतदार एकजुटीने काम करत आहेत.

सध्यस्थितीत पवित्रकार यांनी केलेली विकासकामे, लोकसहभाग आणि सततचा जनसंपर्क या जोरावर आशिष पवित्रकार यांनी एक सशक्त आवाहन निर्माण केले आहे. तिकीट वाटपातील आत्मघातकी धोरणाचा फटका भाजपाला मतदानाच्या दिवशी किती बसतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एकंदरीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपची धक्कादायक स्थिती असल्याची ‌चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!