अकोला दिव्य न्यूज : अकोला महानगरपालिकेत प्रभाग 12 चे प्रतिनिधित्व करताना विकासासाठी प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देत आलों आहे. नागरिकांच्या दीर्घकालीन गरजांचा विचार करून प्रभाग १२ मध्ये भूमिगत गटार बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. या कामामुळे सांडपाणी व्यवस्थेला शाश्वत उपाय मिळून स्वच्छता, आरोग्य आणि जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे भाजप उमेदवार अजय शर्मा यांनी अकोला दिव्य सोबत बोलताना सांगितले.

प्रभाग क्रमांक 12 मधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेले भाजपचे नगरसेवक, उमेदवार अजय शर्मा यंदा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या पॅनलने निवडणुक रिंगणात उतरले आहेत आहे. त्यांच्या सोबत भाजपाचे उमेदवार संतोष डोंगरे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातून भाजपच्या अँड. कल्पना संजय गोटफोडे असून, माजी महापौर मदन भरगड यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार संगीता भरगड असं चौघांच पॅनल मतदारांची पहिली पसंद होतं आहे.

नगरसेवक होण्याचा पुर्वीपासून केवळ बोलण्यावर न कामातून विश्वास संपादन करण्यावर अजय शर्मा यांचा भर राहीला आहे आणि नगरसेवक झाल्यावर मागील 12 वर्षांपासून प्रभाग १२ मधिल मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रस्थानी आहेत. प्रभाग सुव्यवस्थित व विकसित बनवण्याचा संकल्प घेतलेल्या शर्मा यांनी केलेली विकासकामे मतदारांना माहिती आहे. मागील 3 वर्षांपासून अकोला महापालिका प्रशासकाच्या हातात असल्याने काही कामे थांबली आहे.पण आता ती कामे तातडीने मार्गी लावून नवीन कामांना सुरुवात केली जाणार आहे.

विशेष म्हणजे शहरात भुमिगत गटार योजनेची मुहूर्तमेढ रोवणारे माजी महापौर मदन भरगड यांची शर्मा यांना समर्थ साथ ही मोठी जमेची बाजू आहे.असं मतदारांमध्ये चर्चा आहे.प्रभाग क्रमांक 12 मधील संगीत मदन भरगड तसेच अँड कल्पना संजय गोटफोडे व माजी नगरसेवक जान्हवी डोंगरे यांचे पती संतोष डोंगरे यांच पॅनल विजयी चौकार लगावणार असल्याचे दिसून येते आहे.
