Wednesday, February 4, 2026
No menu items!
No menu items!
Homeप्रभाग १३ मध्ये 'एकच वादा'चा निनाद ! अपक्ष आशिष पवित्रकारची आघाडी !...

प्रभाग १३ मध्ये ‘एकच वादा’चा निनाद ! अपक्ष आशिष पवित्रकारची आघाडी ! कामाची पावती मिळण्याचे चिन्ह

अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कधी काळी अकोला शहराची ‘बगीच्याचं शहर’ अशी असणारी ओळख काळाच्या ओघात नष्ट झाली. मात्र या दरम्यान आपल्या कार्यकाळात अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी प्रभाग १३ मध्ये विविध विकासकामे करण्यासोबतच तब्बल ५ उद्यान अर्थात बगिचे तयार करून बगिचांचा प्रभाग अशी नवी ओळख निर्माण करणारे या प्रभागाचे मागील १२ वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे आशिष पवित्रकार यंदा लोकांचा उमेदवार म्हणून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

आशिष पवित्रकार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. प्रभागातील युवक आणि महिला भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. असं चित्र दिसत आहे.पक्षाने उमेदवारी नाकारून अन्याय केला आहे. असं सर्वंच समाजातील मतदार उघडपणे बोलू लागले आहेत.

प्रभागातील नियमितपणे साफसफाई सोबतच जेष्ठ नागरिक, बच्चे कंपनी आणि युवक, महिला यांच्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क, संस्कार उद्यान, राजे छत्रपती संभाजी पार्कसह ५बागबगीच्यांची निर्मिती व योग्य संगोपन करीत प्रभागाचा चेहरामोहरा बदलला. याठिकाणी वॉकिंग ट्रेक, कवायतीची साधने आणि विविध खेळाची खेळणी तयार करण्यासोबतच शुध्द हवा वाहती केली. प्रत्येकाच्या सुख:-दु:खात मदतीला धावून येणारे आशिष पवित्रकार यांच्या अपक्ष उमेदवारीने अनेक समीकरण बदलली आहे.

आरोग्य शिबीर, भागवत कथा सप्ताह, शैक्षणिक सहायता असा काळासोबत प्रभागातील अडगळीत पडलेल्या रस्त्याची जुजबी दुरुस्ती व कॉक्रीटीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावून लोकांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न दूर केला. काम करणारा आशिष अशी ओळख असलेल्या पवित्रकाराबद्दल विचारले असता त्याला एक मत तर द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकंदरीत प्रभागात पवित्रकाराच्या कामाला घेऊन नकारात्मक भूमिका दिसून येत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!