Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeरूहाटीया ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सिध्दार्थ रूहाटीया यांची MACCIA वर निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती

रूहाटीया ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सिध्दार्थ रूहाटीया यांची MACCIA वर निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील ख्यातनाम ‘रूहाटीया ग्रुप’ कार्यकारी संचालक आणि आयव्हीपीए, एफआयईओ, एसईए, सोपा यासारख्या व्यापार संघटनांचे सक्रिय सदस्य सिध्दार्थ शिवप्रकाश रूहाटीया यांची राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील संघटनेची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘गव्हर्निंग काऊन्सील मध्ये ‘निमंत्रित सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

उद्योग-व्यापार विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर राज्यातील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर’ (MACCIA) या संस्थेला पुढील वर्षात अर्थात वर्ष 2027 मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्यावर रूहाटीया यांची निवड महत्त्वाची ठरली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘गव्हर्निंग काऊंसीलमध्ये’ ‘निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड झाल्याबद्दल अत्यानंद होत असून गव्हर्निंग काऊन्सील सदस्य या नात्याने आपली नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार, असा विश्वास अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी व्यक्त करीत रूहाटीया यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रूहाटीया ग्रुपचे तरूण, तडफदार आणि मितभाषी सिध्दार्थ रूहाटीया ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासोबत विदर्भ आणि महाराष्ट्रातील विविध व्यापारी व औद्योगिक संघटनेत सक्रिय सहभाग घेत, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष, व्हीसीसीआय , दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या डीआरयूसीसी सदस्य, यूएसए येथील वायपीओचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.व्यवसायासह सामाजिक ऋण फेडण्यासाठी देखील रूहाटीया कार्य तत्पर असतात.महाराष्ट्र राज्य मारवाडी संमेलनप्रदेश संघटन मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे रूहाटीया यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच लोकमत बाकू आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मोठ्या उद्योगासाठीचा व्हीआयए पुरस्काराने गौरविण्यात आलेले सिध्दार्थ रूहाटीया यांच्या या निवडीबद्दल त्यांचें सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!