Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात लढर्तीचे स्वरूप बदलले ! माघार घेणाऱ्यात भाजप, काँग्रेस व वंचितचे सर्वाधिक...

अकोल्यात लढर्तीचे स्वरूप बदलले ! माघार घेणाऱ्यात भाजप, काँग्रेस व वंचितचे सर्वाधिक उमेदवार

अकोला दिव्य न्यूज : अखेर अकोला महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर सुमनताई गावंडे, काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, भाजपचे उपमहापौर राजेंद्र गिरी, भाजपचे दोन माजी नगरसेवक गोपी ठाकरे व सविता ठाकरे यांच्यासह उद्धवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने आणि शिंदेसेनेच्या शहर प्रमुखासह माजी नगरसेविकेचे पती व एआयएमआयएमच्या महिला उमेदवाराने रिंगणातून माघार घेतली आहे.एकंदरीत काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीच्या १७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अनेक प्रभागांतील लढर्तीचे स्वरूप बदलले आहे.

सहा झोनमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६३३ जणांपैकी १६४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात एकूण ४६९ उमेदवार कायम राहिले आहेत. प्रभाग क्रमांक ११ अ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख इब्राहिम शेख कासम, प्रभाग १२ अ मधून भाजपचे सुगत धनंजय गवई आणि १२ क मधून भाजपच्या दीपिका नरेंद्र पाडिया, राजेश्वरीअम्मा शर्मा, मधु संतोष पांडे यांच्यासह शिंदेसेनेचे जगजितसिंह विरक शिंदेसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी अर्ज मागे घेतले.

प्रभाग १८ क मधून माजी नगरसेवक रूपाली सोमनाथ अडगावकर, एमआयएमच्या उमेदवार नुसरत परवीन आरिफ खान यांचा माघार घेणाऱ्यांत समावेश आहे. प्रभाग १४ ब मधून सुनीता सुनील मुरूमकार, प्रभाग १४ ड मधून वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पातोडे, विजय बोचरे, प्रभाग १५ अ मधून भाजपचे माजी नगरसेवक गोपी उर्फ सुदेश ठाकरे, प्रभाग १५ ब मधून माजी नगरसेविका सविता ठाकरे, प्रभाग १५ ड मधून किशोर अलिमचंदानी यांनी अर्ज मागे घेतले”यासोबतच प्रभाग ६ ड मधून काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, प्रभाग ५ ब मधून माजी नगरसेवक नम्रता मनीष मोहोड, वंचितचे श्रीकांत ढगेकर, प्रभाग क्रमांक ३ मधील शिंदेसेनेच्या उमेदवार संगीता शुक्ल यांनी माघार घेतली आहे.

माघार घेणाऱ्यांत भाजप, काँग्रेस आणि वंचितचे सर्वाधिक उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये भाजपच्या माजी महापौरांसह उपमहापौर आणि दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे; पण, माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. काँग्रेसच्या माजी महापौरांसह ४ नगरसेवकांनी उमेदवारी मागे घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!