अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील व्यवसायिकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महत्वपूर्ण अशा तज्ञ विषय समित्यांपैकी मायक्रो, स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस (MSME) समितीच्या सदस्यपदी अकोला शहरातील युवा उद्योजक आणि भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते पंकज राठी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीबाबत सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे.

मायक्रो, स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस (MSME) समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अत्यानंद होत असून समितीमध्ये आपले अनुभव महत्त्वपूर्ण ठरतील.असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी व्यक्त करून समितीच्या कार्यास पूरक ठरतील अशा योजना किंवा संकल्पनांची माहिती द्यावी. जेणेकरून महाराष्ट्र चेंबर आणि आपणास त्यावर संयुक्तपणे कार्य करता येईल. तसेच समितीमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि प्रभावी समन्वयासाठी समितीच्या इतर सदस्यांसह सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी नवीन जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अण्ड अग्रिकल्चर’ ही शिखर संस्था असून येत्या 2027 या वर्षात संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. हा ऐतिहासिक टप्पा उद्योग-व्यापार विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून अशा वेळी पंकज राठी यांची नियुक्ती करुन त्यांच्या संघटन कौशल्याचा संस्थेला निश्चितच फायदा होईल.
