Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात खून ! प्रेमातील संशयातून 'पुरुष' पार्टनरची हत्या

अकोल्यात खून ! प्रेमातील संशयातून ‘पुरुष’ पार्टनरची हत्या

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहराचा नवीन वर्षाचा पहिलाच दिवशी रक्तरंजीत होऊन, या वृत्ताची शाई वाळत नाही तोच पुन्हा आज शहरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नवीनवर्षात अवघ्या दोन दिवसांत दोन निर्घृण हत्या झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रेमातील संशयातून हत्या. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर भागात आज शुक्रवार २ जानेवारी रोजी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. तीन वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या पुरुषांच्या जोडप्यातील वादाचा शेवट थेट हत्येत झाला. मृत तरुणाचे नाव अमोल दिगांबर पवार (वय ३५) तर आरोपीचे नाव नितेश अरुण जंजाळ (वय ३८) असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल आणि नितेश हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. मात्र अमोल दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. काल रात्रीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी नितेशने लाठीने अमोलच्या डोक्यावर व तोंडावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत अमोलचा जागीच मृत्यू झाला.आज सकाळी नितेश घरातून बाहेर पळत जोरजोरात ओरडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

डायल ११२ वर कॉल मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपी नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!