अकोला दिव्य न्यूज : काळाची पावले ओळखून, पश्चिम विदर्भातील उद्योजक आणि व्यावसायिकांचा हक्क रक्षणासाठी इंग्रजांच्या शासन काळात विदर्भ चेंबरची स्थापना करणारे स्वातंत्र्य सेनानी ब्रजलाल बियाणी यांची चेंबरच्याच कार्यक्रमात झालेल्या अवहेलनामुळे अनेकांजणांनी तीव्र नापसंती व संताप व्यक्त केला ही चुक अजाणतेपणी झाल्याचे बचावात म्हटले जाईल.पण एवढ्या काटेकोर व सर्व बाजूवर लक्ष ठेवून केल्या गेलेल्या भव्य दिव्य आयोजनात संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांचा फोटो कुठे ठेवायचे, यांचे आयोजकांना भान नसावे ? चक्क व्यासपीठाच्या खाली फोटो ठेवणं यापेक्षा मोठे अपमान नाही. ही कुठल्या व्यक्ती वा समाजाचा अवमानना नाही तर उत्तूंग कार्यकर्तृत्वाचा अपमान केला गेला.

विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंड्रस्टीजकडून अकोला शहरातील गौरक्षण संस्थांच्या मैदानावर व्हिटेक्स २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार २ जानेवारी रोजी एका शानदार सोहळ्यात राज्यमंत्री ना. भोयर, खासदार अनुप धोत्रे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यासह गणमान्यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या सुसज्ज व्यासपीठावर चढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाय-यांच्या जवळ विदर्भ केसरी बियाणी यांचा फोटो ठेऊन पुष्प अर्पण करण्यात आले.
इंग्रजांच्या शासन काळात थोर स्वातंत्र्यसेनानी व घटना समितीचे सभासद आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी ब्रजलाल बियाणी यांनी पुढाकार घेऊन विदर्भातील उद्योजक आणि व्यावसायिकांचा हक्क रक्षणासाठी चेंबरची स्थापना केली. लोकांना जोडले आणि चालना दिली. त्यानंतर प्रत्येकांनी केलेल्या कार्यामुळेच ही संस्था महाराष्ट्रात नावारूपाला आली.ब्रजलाल बियाणी यांच कार्यकर्तृत्व केवळ अकोला शहर किंवा जिल्ह्यापुरते नव्हते. तर संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी होते.

अशा महान विभूतीचा योग्य सन्मान आणि आदर या आयोजनात राखणं महत्त्वाचं आहे.कारण ते विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंड्रस्टीजचे संस्थापक अध्यक्ष आहेत. व्यासपीठावर भरपूर जागा असताना अशा प्रकारे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षाचा फोटो खाली ठेऊन आयोजकांना काय साध्य करायचे आहे ? आपल्या कामासाठी स्वतःची पाठ थोपटून घेणे चुकीचे नाही. पण जेष्ठ व श्रेष्ठांचा अपमान अशा प्रकारे करण्याचे कारण काय.. अनेकांनी याबाबत चीड व्यक्त केली.
