Sunday, December 28, 2025
No menu items!
No menu items!
Homeहरीश अलिमचंदाणीसह बंडखोर भाजपात ? उमेदवारी दिली जाईल !

हरीश अलिमचंदाणीसह बंडखोर भाजपात ? उमेदवारी दिली जाईल !

अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतरांना सोबत घेऊन ‘तिसरी आघाडी’ ची मोट बांधण्यासाठी सरसावलेल्या भारतीय जनता पक्षातून निलंबित पदाधिकाऱ्यांचा हा प्रयोग प्रत्यक्षात येण्याआधीच भाजपच्या या निलंबित व बंडखोर नेत्यांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘घरवापसीचा डाव’ यशस्वी झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरात भाजपविरोधात दंड थोपटून ‘तिसरी आघाडी’ उभारण्याची तयारी सुरू होती. मात्र, राजकारणातील चाल नेहमी दोन पावले पुढची असते, हे भाजपने दाखवून दिले.

भाजपने निलंबित आणि बंडखोर नेत्यांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘घरवापसी’ सुरू केली असून यामध्ये माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी, अँड. गिरीश गोखले, डॉ. अशोक ओळंबे हे प्रमुख चेहरे असून, आशिष पवित्रकार प्रतुल हातवळणे यांचीही घरवापसी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, यांतील अँड. गिरीश गोखले यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये घरवापसी केल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान बंडखोरी केल्याने अलीमचंदानी आणि डॉ. अशोक ओळंबे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून हाताळणे, आशिष पवित्रकार आणि गिरीश गोखले यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते.दरम्यान ‘तिसरी आघाडी’ उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. या सर्व घडामोडींत चारही पदाधिकाऱ्यांनी नुकतीच नागपूर येथे प्रदेश भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय होणार असून, त्यांची भाजपमध्ये अधिकृत घरवापसी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्यांना निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या लोकांनी बावनकुळे यांची भेट घेतली आणि समीकरणे बदलली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!