Friday, December 26, 2025
No menu items!
No menu items!
Homeअ.भा.अग्रवाल संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी रमाकांत खेतान

अ.भा.अग्रवाल संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी रमाकांत खेतान

अकोला दिव्य न्यूज : सकल अग्रवाल समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक उत्थानासाठी देशभरात सेवा करणाऱ्या अखिल भारतीय अग्रवाल संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक हरियाणाच्या पंचकुलात येथे उत्साहात होऊन दोन दिवसीय रंगारंग शपथग्रहण सोहळा धुळे येथे नुकताच संपन्न झाला. या राष्ट्रीय कार्यकारिणीत अकोला महानगरातील वरिष्ठ उद्योजक व ज्येष्ठ समाजसेवक रमाकांत खेतान यांची राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.

संघटनेच्या राष्ट्रीय चेयरमनपदी नवी दिल्लीचे प्रदीप मित्तल, राष्ट्रीय अध्यक्षपदी इंदूरचे कुलभूषण मित्तल, राष्ट्रीय महामंत्रीपदी सूरतचे राजेश भारुका, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अकोल्याचे रमाकांत खेतान,राष्ट्रीय संघटनमंत्री धुळ्याचे विनोद अग्रवाल, राष्ट्रीय मंत्रीपदी बोदवडचे गोपाल अग्रवाल, राष्ट्रीय संघटन मंत्रीपदी नाशिकचे किरण अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी कामकाज पाहणार आहेत.

या सोहळ्यात संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष कुलभूषण मित्तल व नूतन कार्यकारिणीचा शपथग्रहण सोहळा संघटनेचे चेयरमन प्रदीप मित्तल व महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचे प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्या प्रमुख आतिथ्यात हर्षोल्लासात पार पडला.ज्येष्ठ समाजसेवी रमाकांत खेतान हे संपूर्ण विदर्भात सामाजिक सेवा कार्यासाठी ओळखले जातात. जनता बँकेचे अध्यक्ष, लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर असून व्यापार, उद्योग, सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये विविध पदावर सेवारत आहेत. त्यांच्या या यशोगाथेच्या पार्श्वभूमीवर त्यांची दुसऱ्यांदा या राष्ट्रीय संघटनेवर निवड झाली आहे.

सोहळ्यात संघटनेचे राष्ट्रीय चेयरमन प्रदीप मित्तल यांनी विविध कल्याणकारी योजनांचे विवरण देत नव्या पदाधिकाऱ्यांना संघटनेची मजबुतीबरोबरच समाजाच्या शेवटच्या रांगेतील घटकांसाठी चिंतन चालू ठेवण्याचे आवाहन केले.या सोहळ्यात धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, अग्रवाल समितीचे माजी अध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, कमलकिशोर अग्रवाल, निरंजन अग्रवाल, अँड. सुरेश अग्रवाल गुरुजी यांच्यासह अकोला व राज्यभरातील समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!