अकोला दिव्य न्यूज : बहुचर्चित किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाची अंतिम सुनावणी अकोला सत्र न्यायालयात सुरू असून या प्रकरणी विशेष सरकारी वकील अँड उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद पूर्ण करून झाल्यावर आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यावर काउंटर अंतिम युक्तिवाद करण्या करिता उद्या बुधवार २४ डिसेंबरला अँड उज्ज्वल निकम अकोल्यात येत आहेत.

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष, प्रॉपर्टी ब्रोकर आणि समाजसेवक किसनराव हुंडीवाले यांची सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या बाहेर दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यांच्यावर जमीन-जुमल्याच्या वाद आणि व्यावसायिक शत्रुत्वातून हत्येचा आरोप आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन प्रसिद्ध वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे, जे सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकरणातील अंतिम युक्तिवादांना सुरुवात झाली असून साक्षीदारांची उलटतपासणी पुर्ण झाली आहे.
अकोला सत्र न्यायालयात सुनावणीसाठी दाखल या प्रकरणात सरकारतर्फे नियुक्त विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्यामार्फत 3 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. त्यानंतर 1 ते 5 डिसेंबर 2025 पर्यंत आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आता त्यावर काउंटर अंतिम युक्तिवाद करण्याकरिता उद्या बुधवारी अँड उज्वल निकम अकोला येथे येत आहेत. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील राजेश्वर देशपांडे व अँड. नरेंद्र धूत सहकार्य करणार आहेत.
