अकोला दिव्य न्यूज : जगातील प्रत्येक देशात एका विशिष्ट सण वा सणाला नवीन वर्षाला सुरुवात केली जाते. भारतातील प्रत्येक राज्यात एका विशिष्ट सणापासून नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. नवीन वर्षाचा दिवस म्हणजे भूतकाळातील चुका विसरून नवीन सुरुवात करण्याची संधी असते.नवीन वर्ष हा एक जागतिक सण आहे, जो दरवर्षी १ जानेवारी रोजी साजरा होतो. नवीन वर्ष १ जानेवारी रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच पार्ट्या, आतषबाजी आणि ‘हॅपी न्यू इयर’च्या शुभेच्छांचा समावेश असतो.

लोक नवीन संकल्प करतात आणि नवीन सवयी लावण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो, जो आशा आणि आनंदाने भरलेला असतो.मात्र एका उदात्त हेतूने प्रेरित या जागतिक सणाला अलिकडच्या काळात बिभित्स स्वरूप प्राप्त होऊन, तरूणाई या दिवशी भरकटत जाते. नवीन वर्षाच्या स्वागतात भूतकाळातील चुका विसरून नवीन सुरुवात करण्याची संधी गमावून बसतो.
इंग्रजी नवीन वर्ष हे फक्त कॅलेंडर बदलणे नसून, ते जीवन जगण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारे आनंद व उत्साहाने भरलेले पर्व आहे. हे येणाऱ्या वर्षासाठी सकारात्मक विचार आणि नवीन ध्येये निश्चित करण्याची प्रेरणा देते.मात्र ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताला लागलेली ही किड समुळ नष्ट करून कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासोबतच नातेसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने १३ वर्षांपूर्वी अकोला येथील नेतल रामसा परिवाराकडून नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला देशातील ख्यातनाम जम्मा जागरण गायकाचा रामदेव बाबा यांच्या जीवनावर आधारित जम्मा जागरण आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

मागील १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या आयोजनात लोकांचा सहभाग वाढत असून यंदाही अकोला शहरातील राधाकिसन प्लॉट येथे बुधवार ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता सुप्रसिद्ध जम्मा एवं भजन गायक कमलेश भट्टड यांचा श्री रामदेव बाबा का जम्मा जागरण आयोजित करण्यात आलं आहे. भक्तांचं सानिध्य लाभो जीवनात सदैव आनंद अन् आनंद राहो हीच सदिच्छा ठेवून मागील १३ वर्षांपासून नेतल रामसा परिवाराचे अनिल लटुरिया, संतोष मालाणी, आशिष बाहेती, सुशील डोडीया, गोविंद बजाज, विजय कलंत्री, संदिप लाहोटी, कैलाश राठी, गोविंद गांधी, सतिश भुतडा, प्रकाश राठी, दिपक कोठारी, निलेश मालपाणी, पंकज तापडिया, राजकुमार मंत्री, सुनील भंडारी, अशोक चांडक, रेखचंद भंसाली, दिपक मोहता, श्याम भुतडा, राजेश मुंदडा, प्रविण चितलांगे, राजेश जाजू सपत्नीक हे आयोजन यशस्वीरीत्या पूर्ण करून नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला मित्र मंडळीना महाप्रसादाचा लाभ मिळवून देत आहेत.
