अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रात पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीने ब्राह्मण समाजातील सक्रिय युवा कार्यकर्त्याला अध्यक्ष पदी नियुक्ती देत, अँड. आंबेडकर यांनी अकोला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला समोरासमोर शह दिला आहे. अकोला शहर पुर्वच्या अध्यक्षपदाची जबाबदारी निलेश देव यांना देऊन गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक व पक्षासाठी केलेले कार्य आणि बाळासाहेब आंबेडकर व कुटुंबाशी एकनिष्ठ असल्याचे फलित म्हणजेच निलेश देव यांची निवड आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी देव यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली असली तरी या पदासाठी देव यांची निश्चितच पात्रता आहे.यामध्ये शंका नाही. तर अकोला पुर्वचे अध्यक्षपद ब्राह्मण समाजाला देऊन वंचितची भविष्यातील रणनिती काय राहील हे देखील लक्षात आणून दिले आहे.
अँड.बाळासाहेब, प्रा.अंजली आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्यासह राज्य अध्यक्षांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचे वचन निलेश देव यांनी दिले. दरम्यान, शहर अध्यक्षपद ब्राह्मण समाजाला दिल्याने त्याचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहे. भाजपने गेल्या दशकात ब्राह्मण समाजाला महत्वाचे पद दिले नसल्याचा नाराजीचा सूर ब्राह्मण समाजात आहे. त्यात वंचितने थेट ब्राह्मण शहर अध्यक्ष करून भाजपला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हे मात्र नक्की.
अकोला शहर पुर्वची कार्यकारिणी घोषित
निलेश देव यांचे संगठन कौशल्य, विविध कल्पक योजना आणि लोकांच्या समस्यांना घेऊन केलेले आंदोलन ही त्यांची जमेची बाजू आहे. इतकेच नाही तर त्यांनी विविध विषयावर अकोला, मुंबई येथे उपोषण केले. न्यू तापडिया नगर उड्डाणपुलासाठी पाठपुरावा, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी केलेली धावपळ, पाणी पट्टीचे अव्वाच्या सव्वा आलेले देयक कमी करण्यासाठी यशस्वी पुढाकार या सर्व आंदोलनात्मक पार्श्वभूमीवर नीलेश देव यांची निवड महत्वाची ठरत आहे. माजी नगरसेविका व लोकनेत्या अँड. धनश्री देव यांचे कोरोना काळात निधन झाले. या दुःखद प्रसंगातून सावरत निलेश देव यांनी स्वतःला समाजकारणात झोकून दिले.वैकुंठ रथ, शवपेटी, रुग्ण सेवा उपकरण बँक, आदिवासींना दिवाळीत मिष्ठान्न व कपडे वाटप असे यशस्वी आयोजन केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष देव यांनी वंचित बहुजन आघाडीची अकोला महानगर कार्यकारिणी गठित केली असून पक्षाचे महासचिव किसन चव्हाण यांनी ही यादी जाहीर केली आहे.
यामध्ये दामोदर जगताप यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ सल्लागार म्हणून बालमुकुंद भिरड, अँड.संतोष रहाटे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून शोभा मुळे, सरला मेश्राम, शोभा शेळके, मनोहर बनसोड, अँड. नरेंद्र बेलसरे, ज्योती खिलारे, सुवर्णा जाधव, शंकर इंगोले, देवानंद खडे, बबलू पातोडे, मंगेश बलखंडे, डॉ.गाडगे, निलेश पवार, आशिष सोनोने, सुगत तायडे आदींचा समावेश आहे.
