अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : बांधकाम व्यवसाय म्हणजे तिथल्या मातीचा वास. तिथलं आभाळ, तिथल पाणी, हवा, माती, माणसं, त्यांचे स्वभाव, समज, संस्कृती, घरं, बोली, गाणी, कविता, संगीत, खाणं, कपडे, त्यांचे रंग…वगैरे वगैरे असं हे सगळं समजून घेण्यासोबत सरकारी नियमांच्या चौकटीत बांधकामाचा केंद्रबिंदू बदलावा लागतो. गळेकापू स्पर्धेत हे अवघडच ! पारंपरिक बांधकामात बहुतेकदा ‘भोज्या’ पद्धती अवलंबली जात असताना काळानुरूप मोठ्या शहरात चलनातील बांधकाम आपल्या अकोल्यात भागात रूजवली तर…..तर ही एक शुध्द कल्पनाच ना ! पण शायर म्हणतो की, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती हैं ! अर्थात माणूस स्वतःचं जीवन आणि वेळ याबाबत किती जागरूक आहे ? हे त्यांचा कार्यकर्तृत्वाने दिसून येते. पंखांची गरज खरं तर पक्षीला आहे.तर व्यक्तीच्या मनात साहस व इच्छाशक्ती असले तर शेवटी जाऊन त्याला आपलं ते लक्ष्य हस्तगत होईल, ज्याचा तो शोध घेत होता आणि एक वेळ अशी येते की अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून प्रचंड यश मिळवणारे उद्योजक आणि व्यक्ती, त्यांच्या कठोर परिश्रमातून आणि चिकाटीतून स्वतःचे साम्राज्य उभे करतात.

विश्वाची निर्मिती कशी झाली, ज्यामध्ये विज्ञान आणि धर्म या दोन्हींमध्ये ‘शून्यातून निर्मिती’ या संकल्पनेवर चर्चा केली जाते, ज्यात देव किंवा महास्फोटासारख्या सिद्धांतांचा समावेश होतो आणि हे लोक किंवा संकल्पना केवळ सुरुवात नसून, अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून काहीतरी मोठे निर्माण करतात, ……हौसलों से उड़ान होती हैं ! म्हटले की या व्यक्ती मधे कठोर परिश्रम आणि चिकाटी आपुसक येते. सोबतच अशा लोकांमध्ये प्रचंड जिद्द असते. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना, थोड्याशा भांडवलावर किंवा कौशल्याच्या जोरावर मोठे उद्योग उभे करणा-यापैकी मॉं साहेब जिजाऊ यांची जन्मभूमी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर गावच्या इन्नाणी कुळातील कुलदिपक सुनील इन्नाणी एक आहेत.असं म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
आपले संपूर्ण आयुष्य उभारणारे सुनील इन्नाणी यांच्यातील विचारांची स्वच्छता, कष्टाची तयारी आणि माणुसकीची ओढ त्यांच्या प्रवासात ठळकपणे जाणवतो. आज बांधकाम क्षेत्रात एक यशस्वी, विश्वासार्ह आणि आदर्श नाव म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरसारख्या छोट्या गावात, साधारण आर्थिक परिस्थितीत जन्मलेल्या सुनील इन्नाणी यांनी संघर्षालाच आपला गुरू मानले. गावातच बारावी (कॉमर्स)पर्यंत शिक्षण पूर्ण करून १९९१ साली अकोल्यात आले. कामाच्या शोधात विविध खाजगी नोकऱ्या केल्या, स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय उभा केला आणि मेहनत, सचोटी व इमानदारीच्या जोरावर २०११ पर्यंत यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःचा ठसा उमटवला.
आपली नाळ मातीशी जोडून राखून असल्याने इन्नाणी यांना बांधकाम क्षेत्राची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. काहीतरी वेगळं, भक्कम उभारण्याची जिद्द त्यांना पुढे नेत राहिली. २०१७ मध्ये त्यांनी “मार्वल ट्रिनिटी इन्फ्रा एलएलपी” आणि “मार्वल ट्रिनिटी रियल इस्टेट एलएलपी” या संस्थांची स्थापना करून अकोला शहराच्या विकासकथेतील एक नवं पर्व सुरू केलं. एखादं काम हाती घेतल्यावर ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची हातोटी सर्वांना ज्ञात आहे. अकोला शहरात केवळ इमारती उभारल्या नाहीत, तर विकासाची दृष्टी दिली. यमुना आर्केड, यमुना बिझनेस पार्क, यमुना टॉवर, यमुना टॉवर-२, त्रिमूर्ती टॉवर, लँडमार्क बिल्डिंग अशा दर्जेदार वास्तूंमुळे अकोल्याच्या व्यापारी नकाशावर शहर अधिक ठळकपणे झळकू लागले. टाटा क्रोमा, KFC, पिझ्झा हट, MR DIY यासारखे नामांकित ब्रँड अकोल्यात आणून शहरवासीयांना मोठ्या शहरांचा अनुभव मिळवून दिला.हे नकळतच कबूल करावे लागते.
अमाप यश मिळालं तरी इन्नाणी यांचे पाय जमिनींवरच नाही तर त्यांनी आपले पाय जमीनीच्या आत खोलवर घट्टपणे दाबली आहेत. हे त्यांचा कृतीतून दिसून येते. माणसांची निवड, सहकाऱ्यांना कुटुंबासारखं जपणं, सुख-दुःखात धावून जाणं आणि वेळप्रसंगी परखडपणे आपले विचार मांडायचे हा त्यांचा स्वभावच त्यांची खरी ओळख आहे. पारदर्शक व्यवहार, गुणवत्तेचा आग्रह आणि वेळेची शिस्त यामुळेच अल्पावधीत प्रचंड विश्वास संपादन केला.
नरेडको (NAREDCO) या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे अकोला युनिटचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी बांधकाम क्षेत्राला संघटित, सकारात्मक आणि दिशादर्शक नेतृत्व दिले. समाजाचे आपल्यावर देणे आहे, या भावनेतून रोजगारनिर्मिती, शिक्षणाच्या संधी आणि शहरविकास यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. नारायणा टेक्नो स्कूलसारखी नामांकित शिक्षणसंस्था अकोल्यात आणण्याचे धाडसही त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.अशा या शून्यातून विश्व घडविणाऱ्या, कर्तृत्व, संघर्ष, आणि दूरदृष्टीचा संगम असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवसानिमित्त एवढेंच की तुमची स्वप्ने उंचावत राहोत आणि अकोल्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रगतीचा प्रवास तुमच्या नेतृत्वाखाली अधिक भक्कम होत राहो.
