अकोला दिव्य न्यूज : नामजप हे एक शक्तिशाली साधन आहे, जे केवळ धार्मिक नाही तर मानसिक आणि शारीरिक स्तरावरही फायदे देते. हे कलियुगातील एक प्रभावी साधना असून, यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात.ही बाब लक्षात घेऊन राजे शिव छत्रपती मंडळ व शास्त्रीनगर वासीयांकडून नाम जप प्रचारार्थ दरवर्षी प्रमाणे अकोला येथून शेगांव साठी मागील १६ वर्षांपासून पायदळ वारी काढण्यात येते.

शास्त्री नगर येथील गजानन चौक येथे पायदळ वारी, दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन राजे शिव छत्रपती मंडळ व शास्त्री नगर वासीयांनी केले आहे. येत्या रविवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता येथून शेगांव साठी पायदळ वारी, दिंडी व पालखी प्रस्थान करणार आहे.
पायदळ वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नावे नोंदणी अनिवार्य असून यासाठी 73850 14747 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. गजानन महाराज भक्त आणि भाविक जणांनी जास्तीत जास्त संख्येने पालखीत सहभागी होवून, शास्वत आनंदाची अनुभूती घ्यावी. असे आवाहन राजे शिव छत्रपती मंडळाचे अध्यक्ष पिंटु टेकाडे आणि आयोजकांनी केले आहे.
