Friday, December 12, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी १० कोटी निधी द्या

अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी १० कोटी निधी द्या

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निलेश देव यांचे निवेदन
अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील विदर्भातील एकमेव व ऐतिहासिक वास्तू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाची योग्य देखभालीचा अभावामुळे दुरावस्था झाली आहे. ही दुरावस्था बघून शहरवासियांच्या मनात खदखदत असलेला असंतोष दूर करण्यासाठी तातडीने या वास्तूच्या विकासकामासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे १० कोटी रूपये निधी मंजूर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश रामकृष्ण देव यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे केली.

२०१५-१६ पासून प्रलंबित मंजुरी – अनेक शासनपत्रांचा संदर्भ
दिलेल्या निवेदनात 31 ऑगस्ट 2015 ते 19 ऑगस्ट 2016 दरम्यान विविध शासन कार्यालयांनी पाठविलेल्या पत्रव्यवहाराचा उल्लेख करून, खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी फॉलो-अप अभावी अव्ययित राहिला असल्याचे निदर्शनास आणले आहे. 2016 मधील जिल्हा वार्षिक योजनेत प्राथमिक मंजुरी; मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय कार्यालयांचे पत्र; तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या पत्रांचा दाखला निवेदनात देण्यात आला आहे.
नाट्यगृहाची आजची अवस्था अत्यंत दयनीय
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २०१३ साली करण्यात आलेली ५० लाखांची तात्पुरती दुरुस्ती सोडली तर गेल्या दशकभरात नाट्यगृहावर मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे.
सीनिक डिझाईन, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था, इलेक्ट्रिकल नेटवर्क, ड्रेनेज, आसनव्यवस्था, सुरक्षामानके अशा कोणत्याही घटकांमध्ये आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या नाहीत.
या अवस्थेमुळे विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, नाट्य उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र असणारे हे नाट्यगृह वापरण्यास अडथळे निर्माण होत आहेत, असे निवेदनात नमूद आहे.
स्व. अँड. धनश्री देव यांनी सादर केलेला प्रकल्प आराखड्यात शासन नोंदीत उपलब्ध
वंचित बहुजन आघाडीच्या तत्कालीन गटनेत्या स्व. अँड. धनश्री देव यांनी स्वखर्चाने तयार करून मनपा व जिल्हा प्रशासनास सादर केलेला संपूर्ण तांत्रिक ब्ल्यूप्रिंटमध्ये अधिकृत नोंदीत उपलब्ध असून,
या आराखड्यात—

मंचसज्जा व तांत्रिक सुधारणा

प्रेक्षक आसनव्यवस्थेचे उन्नतीकरण

सुरक्षा मानकांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कामे

प्रकाश व ध्वनीव्यवस्थेची संपूर्ण आधुनिकता

आपत्कालीन यंत्रणा व सुविधा

यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, शासनस्तरीय सुधारित अंदाजपत्रक व प्रशासकीय मंजुरी अद्याप प्रलंबित आहे.
राज्याची सांस्कृतिक संपत्ती – प्राथमिकता श्रेणी A मध्ये समाविष्ट करण्याची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रात स्थापन झालेले हे एकमेव खुले नाट्यगृह असल्याने या प्रकल्पाला राज्याच्या सांस्कृतिक धोरणानुसार “प्राथमिकता A” श्रेणी दिली जावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मार्गे निधी मागणी वैध – निवेदनकर्त्यांचा मुद्दा :

निवेदनात वित्त विभागाच्या कार्यपद्धतीचा दाखला देत म्हटले आहे की हिवाळी अधिवेशनात Supplementary Demand मार्गे निधी उपलब्ध करून देणे हा विधिसम्मत, प्रशासकीयदृष्ट्या मान्य व तातडीचा मार्ग आहे.
या निधीद्वारे–

सुधारित DPR

प्रशासकीय मंजुरी

आर्थिक मान्यता

ई-टेंडर प्रक्रिया

हे सर्व तात्काळ सुरू करता येईल, असे निलेश देव यांनी स्पष्ट केले.
आमदार साजिद खान पठाण यांनाही प्रत
उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनाची प्रत अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनाही पाठविण्यात आली असून,
ते मनपा विरोधी पक्षनेते असताना त्यांनी या प्रकल्पासाठी सुचवलेला मनपा सर्वसाधारण सभेचा ठराव (दि. 19/08/2016) देखील जोडण्यात आला आहे.
“अकोल्याच्या सांस्कृतिक भविष्यासाठी निधी अत्यावश्यक” —निलेश देव
विदर्भातील सांस्कृतिक ओळखीचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आज दुरावस्थेत आहे. राज्य सरकारने तातडीने १० कोटींच्या निधीला मंजुरी देणे अत्यावश्यक आहे, असे निलेश देव यांनी निवेदनात नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!