Friday, December 12, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोलेकर अनुभवणार 13 व 14 डिसेंबरला उल्का वर्षाव !

अकोलेकर अनुभवणार 13 व 14 डिसेंबरला उल्का वर्षाव !

अकोला दिव्य न्यूज : जेमीनाइड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘उल्का वर्षाव’ ला 4 डिसेंबरला सुरुवात झाली आहे. पण सर्वाधिक उल्का आपल्याला 13 आणि 14 डिसेंबरला दिसणार आहेत. जेमिनी कॉन्स्टेलेशन अर्थात मराठीत ज्याला मिथुन म्हणतात, मिथुन राशीचे किंवा मिथुन तारका संघाचे प्रमुख दोन तारे आहेत. ज्यांचं नाव आहे कॅस्टर आणि पोलक्स असं म्हटलं जातं.

सध्या दिसणारा उल्का वर्षाव या दोन ताऱ्यांच्या मधल्या भागातून येतो. निवडलेल्या जागेनुसार साधारणता 60 ते 150 उल्का आकाशा मधून पृथ्वीकडे झेपावतील. सर्वसाधारणपणे उल्का वर्षाव हा धुमकेतूमुळे होत असतो. केव्हा तरी धूमकेतू येऊन गेलेला असतो त्याची शेपटी (रेमिनंट्स) मागे उरलेले असतात ते तिथेच असतात त्यांच्या मधून जेव्हा पृथ्वी जाते त्यावेळेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने
धुमकेतूच्या शेपटीमधील कण पृथ्वीकडे ओढले जातात येताना वातावरणाशी त्यांचं घर्षण होतं आणि आपल्याला तारा तुटताना म्हणजेच उल्का पडताना दिसतात.

परंतु जेमीनाइड म्हणजे मिथुन तारका संघामधून दिसणारा उल्का वर्षाव हा धुमकेतूमुळे नाही. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये अशनींचं कड आहे यालाच ऍस्टेरॉइड बेल्ट म्हणतात. या बेल्ट मधला एक ऍस्टेरॉइड आहे 3200 पायथॉन. हा अशनी सूर्याभोवती 524 दिवसांमध्ये (पृथ्वीचे दिवस) एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ही प्रदक्षिणा अर्थातच लंब वर्तुळाकार म्हणजे इलिप्टिकल असते ज्यावेळेला तो सूर्याच्या सर्वाधिक जवळ जातो तेव्हा त्याची कक्षा बुधाच्या कक्षेपेक्षाही सूर्याच्या जास्ती जवळ जाते थोडक्यात तो सूर्याच्या सगळ्यात जवळचा अशा वेळेला त्याच्या वस्तुमानाचं बाष्पीभवन होऊन धुमकेतुला जशी शेपटी येते तशीच या अशनीला पण येते आणि पृथ्वी या शेपटीच्या जवळून जात असताना आपल्याला हा मिथुन उल्का वर्षाव दिसतो.

13 आणि 14 डिसेंबरला चंद्र मिथुन राशि पासून बऱ्यापैकी दूर राहील, लहान असेल त्यामुळे रात्री बारा ते सकाळी चार अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उल्कावर्षाव पाहता येईल. मिथुन राशि रात्री बारा वाजताच्या सुमारास दक्षिण पूर्व याच्या मधल्या भागामध्ये असेल. आपण आपला हात साधारण 60° वर नेल्यानंतर हा उल्का वर्षा पाहता येईल. अकोलेकर व इतरांनी हा जरूर पहावा निसर्गाची आतिषबाजी पण प्रदूषण न पसरवणारी अशी आपल्याला पाहायला मिळेल स्वतः आपण पहा मित्रांना दाखवा आणि याच्या मागचं कारणही जाणून घ्या कुतूहल जागं ठेवा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!