अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील व्यावसायीक कुटुंब व केजडीवाल ड्राय फ्रुट व चॉकलेट या प्रतिष्ठानचे संचालक आणि अग्रवाल समाजातील प्रतिष्ठित स्व. ताराचंद केजडीवाल यांच्या पत्नी पुष्पादेवी ताराचंद केजडीवाल यांचे काल सोमवार ८ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर वयोमानानुसार निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८३ वर्षाचे होते. जनता बँकेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यपालन अधिकारी नरेंद्र अग्रवाल यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या मागे तीन पुत्र नरेंद्र, ललित व घनश्याम आणि २ मुली तसेच नातू आदित्य केजडीवाल यांच्यासह सूना, जावाई व नात नातवंडाचा मोठे आप्त परिवार आहे.

अलिकडच्या काळात वयानुसार प्रकृतीची कुरबुर सुरू असताना काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या लाघवी स्वभाव, सर्वांना आपुलकीची वागणूक आणि धर्मपरायणता यामुळे नातलगांसह परिसरात सर्वत्र परिचित होत्या.
त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार ९ डिसेंबर रोजी रणपिसे नगर येथील चंबुक घराजवळच त्यांचे निवासस्थान ‘शिवकृपा’ येथून दुपारी २ वाजता मोहता मिलसाठी निघणार आणि तेथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
