अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक प्रगतीत ब्रजलाल बियाणी यांचे मोठे योगदान असून युवकांनी त्यांच्या सेवाकार्याचा वसा घ्यावा. त्यांच्या स्मृतीने पावन झालेल्या या गांधी जवाहर बाग परिसरातील त्यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसराचे सौंदर्यीकरण होणे गरजेचे असून यासाठी सर्वांनी पुढाकर घेण्याचे आवाहन हिंदी साहित्य अकादमीचे प्रदेश सदस्य श्याम शर्मा यांनी केले.

भारतीय घटना समितीचे सभासद मध्य प्रांताचे पहिले अर्थ मंत्री, आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व साहित्यिक विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी यांचा १२९ वा जयंती दिनानिमित्त आज ६ डिसेंबर रोजी सामुहिक आदरांजली कार्यक्रम गांधी जवाहर बाग परिसरातील बियाणी यांच्या पुतळ्यासमोर संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शर्मा बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात माहेश्वरी समाज ट्रस्टचे प्रधानमंत्री विजयकुमार राठी यांनी प्रास्ताविकातून आपले विचार व्यक्त करून आदरांजली वाहिली.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व नागरिकांनी बियाणी यांच्या प्रतिमेस हारार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मान्यवरांनी बियाणी यांच्या सामजिक, शैक्षणिक व राजकिय सेवा कार्याचा आढावा घेत त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संचालन समाज ट्रस्टचे ट्रस्टी तसेच महासभा प्रतिनिधी प्रा.डॉ.रमण हेडा तर आभारप्रदर्शन सेवाश्रयचे विजय रांदड यांनी मानले.

जयंती सोहळ्याला माहेश्वरी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, ब्रजलाल बियाणी विद्यानिकेतनचे सचिव अनिल भुतडा, कस्तूरी चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष प्रा.किशोर बुटोले, नारायण सेवा संस्थानचे हरीश मानधने, फेसकॉमचे विनायक पांडे, संस्कृति संवर्धन समितिचे डॉ आर.बी. हेड़ा, समाज ट्रस्टचे माजी सचिव रमण लाहोटी, माजी कोषाध्यक्ष कमलकिशोर बियाणी, राधेश्याम भंसाली, पत्रकार कमल शर्मा, माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना हेडा, सल्लागार हेमा खटोड, सहसचिव राधा टावरी, नवयुवती मंडळाची अध्यक्ष नंदिनी बजाज, वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या अध्यक्षा प्रमिला लाहोटी, सचिव वीणा राठी, ट्रस्टचे ट्रस्टी अनिल राठी, प्रवीण हेडा, राजेश भन्साली, प्रा डॉ.महेश मुंदडा, जिल्हा महिला संगठनच्या अध्यक्षा उषा बाहेती, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठचे सचिव राजीव मुंदडा, सहसचिव राजेंद्र चितलांगे, माहेश्वरी तहसील संगठनचे अध्यक्ष जयप्रकाश चांडक, प्रदेश माहेश्वरी संघठन चे जगदीश मुंदडा, माहेश्वरी युवा संगठनचे प्रदेश समन्वयक प्रा.डॉ. राम बाहेती, आ भा माहेश्वरी कपल क्लबचे गिरीश तोष्णीवाल, सहयोग ग्रुपचे डॉ ओमप्रकाश साबू, समर्पणचे मनोज रांदड, संस्कार परिवारचे गणेश मुंदडा, आशीष सारडा, डॉ विरेंद्रकुमार झा, गोविंद लखोटिया, बाबुराव देशमुख, गणेश जवादे, मुन्ना ठाकूरसह नागरिक महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
