अकोला दिव्य न्यूज : जिल्हा स्तरावरील रस्सीखेच स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर आपले स्थान निश्चित करून अकोला येथील बिरला कॉलनी स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजंदा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरावरील रस्सीखेच स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून उज्वल करवते, रोशन साळवे, संदेश पवार, ईशांत राऊत, वेदांत नावकार, यश मोरे, आरुष टोबरे, प्रदिव्य मोहोळ, प्रशांत गावंडे आणि अर्णव जाधव यांनी सहभाग नोंदवला.
१७ वर्षे वयोगटातून दर्शन घरडे, समर्थ धरमठोक, स्वयम् जुमळे, सुजित कुमार शिरसाट, वेदांत काळणे, यशराज पाईकराव, अनुज लावंड, संकल्प पाटील, वेदांत गणेश आणि ऋषभ मिश्रा यांनी विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
१७ वर्ष वयोगट मधे मुलींच्या संघानेही विभागीय स्तरावर बाजी मारत विशेष कामगिरी केली. खुषी वानखडे, दर्शना बेलसरे, अनुष्का पटेल, धनश्री नेमाडे, अंजली चऱ्हाटे, साक्षी वीरमोट, मृणाली लोखंडे, आराध्या मोरे आणि सलोनी खानापुरे यांनी या स्पर्धेत उत्तम कौशल्य दाखवले.
सर्व विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाल्याने अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रदिपसिंह राजपूत व प्राचार्या मनिषा राजपूत यांनी विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच क्रीडा शिक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाचेही कौतुक करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील विभागीय स्पर्धेसाठी पालक व नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
