Wednesday, November 26, 2025
No menu items!
No menu items!
Homeशिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुखपदी अभिजित अडसूळ ! माजी आमदार बाजोरिया भंडारा...

शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुखपदी अभिजित अडसूळ ! माजी आमदार बाजोरिया भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख ; आमदार- खासदार उतरणार मैदानात

अकोला दिव्य न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून  संपर्क प्रमुख म्हणून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे निर्देश संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. अकोला जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून अभिजित अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी आमदार गोपी किसन बाजोरिया यांना भंडारा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून एकूण 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरेंकडून याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी गरपंचायतीच्या आणि नगरपरिषदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी अनेक नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. अनेक ठिकाणी जोरदार लढती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यादी

सिंधुदुर्ग. किरण पावसकर आणि राजेश मोरे
                 

रत्नागिरी. यशवंत जाधव

रायगड ग्रामीण. संजय घाडी

नवी मुंबई शहर. नरेश म्हस्के

पालघर. रवींद्र फाटक

ठाणे ग्रामीण. प्रकाश पाटील

ठाणे शहर. नरेश म्हस्के

पुणे. नरेश म्हस्के

पिंपरी चिंचवड शहर. सिद्धेश कदम

पुणे ग्रामीण. श्रीरंग आप्पा बारण आणि रामभाऊ रेपाळे

सातारा. शरद कणसे

सांगली. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर. धैर्यशील माने आणि संजय मंडलिक
सोलापूर. संजय कदम. नाशिक लोकसभा. रामभाऊ रेपाळे

दिंडोरी लोकसभा. रामभाऊ रेपाळे आणि भाऊसाहेब चौधरी
जळगाव. सुनिल चौधर नांदुरबार. राजेंद्र गावीत धुळे. मंजुळा गावित

छत्रपती संभाजीनगर महानगर. विलास पारकर. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. अर्जुन खोतकर

जालना. अर्जुन खोतकर आणि भास्कर आंबेकर बीड. टी. पी मुंडे आणि मनोज शिंदे

धाराशीव. राजन साळवी

नांदेड. सिद्धराम म्हेत्रे

बुलढाणा. हेमंत पाटील

अहिल्यानगर. विजय चौघुले

परभणी – श्री.आनंद जाधव

नागपूर ग्रामीण- श्री. दिपक सावंत

नागपूर शहर. दिपक सावंत

गडचिरोली. दिपक सावंत आणि किरण पांडव

भंडारा. गोपीकिशन बाजोरिया

अमरावती. नरेंद्र भोंडेकर

वर्धा. राजेंद्र साप्ते 

यवतमाळ. हेमंत गोडसे

वाशिम. जगदीश गुप्ता

हिंगोली. हेमंत पाटील

अकोला. अभिजित अडसूळ

चंद्रपूर. किरण पांडव

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!