अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अकोल्याच्या वसंत देसाई क्रीडा संकुल येथे आयोजित आंतरमंडळीय क्रीडा महोत्सवाचे आज बुधवारी थाटात उद्घाटन पार पडले.या सोहळ्याचे उद्घाटन महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, पारस महानिर्मितीचे मुख्य अभियंता शरद भगत, तसेच अमरावती महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या स्काऊट गाईडच्या पथकाने दिलेली मानवंदना आकर्षण ठरली. क्रीडा साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता संजय काटकर यांनी केले. प्रमुख अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी सतिषचंद्र भट्ट, महानिर्मितीचे मुख्य अभियंता शरद भगत व महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटक महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सोहळ्याचे कौतुक करीत खेळाडूंना शुभेच्छा देत उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

त्यांनतर एलआरटी महाविद्यालयाचे एनसीसी व पातूर येथील किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूलच्या स्काऊट गाईड पथकाचे पथसंचलन करीत महापारेषणच्या सहभागी स्पर्धकांचा रूट मार्च पार पडला. त्यानंतर मशाल प्रज्वलित करीत मान्यवरांना सन्मानाने सपूर्द करण्यात आली. उदघाटक व मुख्य अभियंता संजीव भोळे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. उद्घाटन सत्राचे बहारदार संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता समीर देशपांडे यांनी तर क्रीडा महोत्सवाचे सचिव तथा कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे यांनी आभार मानले.
या महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, ब्रिज या खेळाचे सामने दिवसभर रंगले. उद्या गुरुवार दि. २0 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता धावणे, रिले, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे विविध मैदानी खेळ रंगणार आणि त्यानंतर अंतिम सामने होणार असून पारितोषिक वितरण सायंकाळी ४ वाजता वसंत देसाई स्टेडियम येथे मान्यवरांच्या उपस्थिती पार पडणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी महापारेषण अऊदा संवसु अकोला मंडळाचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
