अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि बांधकाम क्षेत्रातील लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वच घटकांना व्यावसायिक चालना देण्यासाठी सतत कार्यरत क्रेडाई अकोला शाखेच्या अध्यक्षपदी शिल्पकार बिल्डर्सचे संचालक सुनील हातेकर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

क्रेडाई अकोला शाखेच्या सभेत अध्यक्षासह पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुशील खोवाल,अभय बिजवे आणि धर्मेंद्र सनेना तर सचिवपदी मोहम्मद जावेद तसेच सहसचिव म्हणून सचिन कोकाटे व सतिष धनोकार यांची निवड करण्यात आली. निर्वतमान कोषाध्यक्ष शरद सावजी यांना पुन्हा कोषाध्यक्ष म्हणून तर सह कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देताना नितीन लहरीया व विजय बोर्डे यांची सहकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जनसंपर्क अधिकारीपदाची जबाबदारी अमरिश पारेख पार पाडणार असून मार्गदर्शक म्हणून सर्व माजी अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे.

अकोला शहरात १९९६ च्या सुमारास तत्कालीन अकोला बिल्डर्स असोसिएशनच्या स्थापनेपासून अलिकडच्या क्रडाई संघटनेच्या स्थापनेपर्यंत सक्रिय सहभाग घेत, बांधकाम व्यावसायिक आणि सर्व संबंधितांना न्यायहक्क मिळवून देण्यात अकोला शहरातील सर्वच बिल्डर्सचे योगदान आहे. अकोला येथे पहिल्यांदा मटेरिका नावाने बांधकाम क्षेत्रातील समग्र साहित्य आणि तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्रातील हे पहिले यशस्वी आयोजन होते आणि त्यांनंतर आजगत ते आयोजित करण्यात येते, पुढच्या वर्षी सर्वांची सहमती व सहकार्याने मटेरिका आयोजित करण्याचा मानस हातेकर यांनी व्यक्त केला.
