Sunday, November 16, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोला एसपी आणि पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानना कार्यवाहीची प्रक्रिया सुरू

अकोला एसपी आणि पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानना कार्यवाहीची प्रक्रिया सुरू

अकोला दिव्य न्यूज : अकोला पोलिस विभागाचे जिल्हा पोलिस अधीक्षक व अधिकाऱ्यांनी न्यायालयीन आदेशांचे सातत्याने उल्लंघन केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी न्यायालयात तपास अहवाल सादर करण्यात अपयशी ठरले आहेत. ज्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमान कार्यवाही सुरू करण्याचा आदेश दिले.

अकोला शहरातील जुने शहर पोलिस स्टेशनमधील ‘साजिदा परवीन शौकत अली विरुद्ध अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी’ या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होऊन यामध्ये संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी मागील आदेशानुसार तपासाच्या प्रगतीचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित अधिकारी यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही. न्यायालयाचा आदेशाचे पालन केले नसल्याने हा सरळ सरळ न्यायालयाचा अवमान झाल्याने अवमानना कार्यवाही प्रस्तावित केले.

न्यायालयाने संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना कोर्टात प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहण्याची सूचना दिली असून, त्यांच्या वर्तनाची माहिती नियुक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील व्हावी म्हणून आदेशांची प्रत पाठविण्याचा निर्देश दिला आहे. याचिकाकर्तीतर्फे अँड.परिमल कवीश्वर, अँड.चैतन्य कुलकर्णी व अँड संतोष गोळे यानी बाजू मांडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!