अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक प्रतिष्ठान ‘शिल्पकार बिल्डर्स’चे युवा संचालक सिध्दार्थ सुनील हातेकर यांनी बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून नवीन ‘व्हिजन’ ठेवून उभारलेली टाऊनशिपची दखल घेत सर्वोत्तम उदयोन्मुख तरुण टाउनशिप डेव्हलपरसाठी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

इंडोनेशियामधिल बाली येथे आयोजित एका आगळ्यावेगळ्या सोहळ्यात सिने अभिनेता जिमी शेरगील यांच्या हस्ते भारतातील दैनिक भास्कर ग्रुप कडून हातेकर यांना सर्वोत्तम उदयोन्मुख तरुण टाउनशिप डेव्हलपरसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रातील प्रतिभावान युवा उद्योजकांनी पारंपारिक पद्धतीने केल्या जात असलेल्या व्यवसायाला नवीनत्तम आवडीनिवडीची सागंड घालून स्पर्धेत आपला एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे. याच तत्त्वावर सुनील हातेकर यांचा मुलगा सुनील हातेकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून वडिलांनी उभारलेल्या शिल्पकार बिल्डर्सच्या कामातून व्यवसायीक जीवनाला सुरुवात केली.

बदलत्या काळानुसार या क्षेत्रात बरेच काही बदल घडून येत आहेत. सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मुलभूत सोयीसोबतच इतरही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मोजक्याच शहरापर्यंत असलेल्या या सोयीसुविधा आणि टाऊनशिप संस्कृतीची अकोला शहरात रूजूवात व्हावी, हा विचार मनात आला आणि अकोला शहरालगत खरप रोडवर सिध्दार्थने टाऊनशिपचा पाया घातला. आज ही टाऊनशिप अकोल्यातील बांधकाम क्षेत्राचे ‘लॅण्डमार्क’ आहे.

युवा उद्योजकांनी केलेल्या कार्याची इतरांना माहिती व्हावी यासाठी भास्कर ग्रुपकडून देशपातळीवर युवा उद्योजकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा सन्मान करण्यात आला. यामध्ये हातेकर यांची निवड होणे अकोलेकरांसाठी गौरवास्पद बाब आहे.
