अकोला दिव्य न्यूज : फॅशन ही केवळ बाह्य देखावा नसून, ती स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, ज्यामुळे व्यक्ती आपले समूह, मूल्ये आणि जगण्याचा मार्ग दर्शवू शकते.फॅशन ही एक कला आहे, ज्यामध्ये कपड्यांच्या रंगांमधून, फॅब्रिकमधून व डिझाइनमधून व्यक्ती आपल्या भावना आणि विचार व्यक्त करते.नेमकी ही बाब लक्षात घेऊन पूनम अमित मणियार यांनी पहिल्यांदाच आणली आहे ‘ईका’ची अशी एक दुनिया की जेथे तुम्ही प्रवेश करताच जेथे तुमची सुंदरता उलगडते.

अकोला येथील टॉवर चौक येथील पंजाब ग्रिल येथे उद्या मंगळवार ७ आणि बुधवार ८ ऑक्टोबर असं दोन दिवसांसाठी पुनम मणियार ‘ईका’च्या माध्यमातून काळानुरूप फॅशनमध्ये पहिले पाऊल टाकत आहे. विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे की, ‘ईका’ म्हणजे जिथे नमुने व्यक्तिमत्व बनतात. आत या, स्टाईलमध्ये बाहेर पडा, असं मणियार यांनी सांगितले.या दोन दिवसाला सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणा-या ईका मधील लेहेंगा, साड्या, दुपट्टे आणि ड्रेसेसच्या उत्कृष्ट संग्रहासोबत तुमची शैली जिवंत करा !

फॅशन तुमच्यापासून सुरू होते आणि प्रीमियम फॅब्रिक्सच्या विशेष श्रेणीतून समृद्ध पोत, कालातीत डिझाइन आणि अंतहीन संयोजनात तयार कपडे म्हणजेच खरोखर तुमचा वाटणारा पोशाख ! तो एक भव्य उत्सव असो किंवा साधा मेळावा असो, ईका मधून घेतलेल्या पोशाखाने तुमची कल्पनाशक्ती जिवंत होते. तेव्हा ‘ईका’ मध्ये या आणि खात्री करून घ्या, असं आवाहन पुनम मणियार यांनी केले आहे.
