अकोला दिव्य न्यूज : दिवाळी म्हणजे फटाके, रोषणाई आणि गोडधोड एवढंच नाही… खरी दिवाळी म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात प्रकाशाचा छोटासा किरण प्रज्वलित करावा,या भावनेतून ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ मागील पाच वर्षांपासून सातत्याने मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये दिवाळीचा आनंद पोहोचवत आहेत.

या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे अंधारात जगणाऱ्या कुटुंबांच्या आयुष्यात दिवाळीच्या दिव्यांची उजळण होते. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही या प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी पुढाकार घेत ५ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान जुने कपडे व दिवाळी भेट वस्तू संकल्प शिबिराचे आयोजन केले आहे.
अकोलेकरांनी घरातील शिल्लक पण स्वच्छ व वापरण्यायोग्य कपडे, साड्या, जीन्स, बेडशीट्स तसेच थंडीचे स्वेटर, शालेय साहित्य, आरोग्योपयोगी वस्तू या शिबिरात आणाव्यात. इच्छेनुसार दिवाळीचा फराळही देऊ शकतात. सर्व साहित्य मेळघाटातील आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.

उपक्रमासाठी कपडे वा साहित्य जमा करण्याचे ठिकाण –
निलेश देव मित्र मंडळ कार्यालय,
ॲड. धनश्री देव रुग्ण कल्याण उपकरण बँक,
जठारपेठ पोलीस चौकीजवळ, जठारपेठ, अकोला.
आर्थिक मदतीसाठी इच्छुकांनी ७७९८८८०३५५ या क्रमांकावर, तर अधिक माहितीसाठी ९८६०१२२५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नसून, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी ॲड. धनश्री देव यांच्या स्मृतिदिनी आदिवासी बांधवांसोबत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. निलेश देव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत शेकडो आदिवासी घरांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचवला गेला असून यंदाही तो परंपरा पुढे नेण्याचा संकल्प आहे. आपल्या छोट्याशा योगदानामुळे कोणाच्या घरात उजेड पेटतो, हेच खरी दिवाळीची खरी ओळख आहे,असे आवाहन निलेश देव यांनी केले आहे.
