अकोला दिव्य न्यूज : निसर्गाच्या मनाचा ठाव आजवर कोणीही घेऊ शकला नाही.त्याचा तावडीत कधी कोण,कसा संपणार किंवा वाचेल हे भविष्यवेत्ताही सांगू शकत नाही आपल्या शक्तीनं देव लोक व पातळ लोकात साम्राज्य करणारा राक्षस राजा रावणाला दरवर्षी त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या अंत्यसंस्काराचा प्रचंड ‘दाह’ सोसत राखरांगोळी करुन घ्यावी लागते. मात्र यंदा देशातील विशेषतः उत्तर भारतात वरूणराजाने लोकांच्या ‘रावण दहन’ मनसुब्यांवर पाणी फेरलं !

यंदा रावण राखरांगोळी होण्यापासून वाचला पण वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने कुठे रावणाच मुंडकं उडलं तर कुठे पुर्णपणे जमीनदोस्त झाला. तर कुठे तुकडे तुकडे होऊन वाहत गेला. एकमात्र की, देवांना सळो की पळो करणाऱ्या रावणाला यावर्षी वरुणराजाचा चांगलाच मार खावा लागला आणि दरवर्षीप्रमाणे ‘पुतला जलाओ’ वालोच्या आनंदावर विरजण पडले. विजयादशमीच्या दिवशी मोठ्या संख्येने व उत्साहाने रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र काल दहनासाठी उभारलेले रावण व कुंभकर्णाचे पुतळे कार्यक्रमाच्या आधी पाऊस होत असल्यानं कोसळले.

रामलीला मैदानावर मुसळधार पाऊस सुरू होताच, रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांचे पुतळे पाण्यात भिजू लागले. पावसापासून वाचण्यासाठी प्रेक्षक इकडे तिकडे धावू लागले. पावसाने मेळाव्यात व्यत्यय आला, ज्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आला. पुतळा पाहण्यासाठी बरेच लोक आले होते, परंतु पावसामुळे त्यांना परिसर सोडावा लागला.
पावसामुळे रावण दहनाच्या आनंद-उत्साहावर विरजण पडले. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनापूर्वीच मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे रावणाच्या कुटुंबाचे आणि दहशतवादाचे प्रतीक असलेले पुतळे भिजले. पुतळे ओले होऊ लागले, त्यामुळे आयोजकांची चांगलीच भांबेरी उडाली.

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील शाहगंज येथील रामलीला मैदानावर मुसळधार पावसात रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं. पावसामुळे पुतळा कोसळला, होता, परंतु आयोजकांनी तो तसाच जाळला. प्रेक्षकांनी छत्र्यांसह आणि पावसात भिजून दहन सोहळा पाहिला.
अचानक आलेल्या पावसामुळे संभल जिल्ह्यात रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसाने रामलीला मैदानातील भव्य पुतळे पूर्णपणे भिजले आणि अनेक भागांचे नुकसान झाले.

पाटण्यातील गांधी मैदानात रावण दहनाची तयारी सुरू असतानाच आकाशात काळे ढग जमा झालेत. मुसळधार पाऊस पडला. फटाक्यांनी सजवलेले रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे महाकाय पुतळे पूर्णपणे भिजले आणि मुसळधार पावसामुळे रावणाचे मुडकं उडाले.
