Sunday, December 21, 2025
No menu items!
No menu items!
Homeरमण चांडक हत्या प्रकरण ! आरोपी रेळेचा पहिला जामीन अर्ज फेटाळला

रमण चांडक हत्या प्रकरण ! आरोपी रेळेचा पहिला जामीन अर्ज फेटाळला

अकोला दिव्य न्यूज : लाखो रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारात विश्वासघात करून अकोला येथील व्यापारी रमण चांडक यांची अकोट तालुक्यातील पोपटखेड शेतशिवारातील आडरस्त्यात अज्ञातस्थळी घेऊन जाऊन निर्घृणपणे हत्या प्रकरणातील एकमेव आरोपी गजानन रेळे याचा जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.आरोपीचा पहिलाच जामीन अर्ज होता आणि तो नामंजूर केला. घटनेच्या दिवसांपासून आरोपी हा अकोला कारागृहात ८ एप्रिल २०२५ पासुन बंदीस्त आहे.

संग्रहित छायाचित्र

या घटनेची थोडक्यात माहिती अशी की, ८ एप्रिल २५ रोजी सकाळी सात वाजता पोपटखेड गावाच्या मुख्य रोडवरून १०० ते १५० मीटर अंतरावरील एका जुन्या आणि अर्धवट झालेल्या बांधकामावर रमण चांडक यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कायदेशीर कारवाई करुन मर्ग दाखल करण्यात आला.

दरम्यान वडाळी सटवाई येथील गजानन साहेबराव रेळे याने पैशांचा देवाणघेवाणच्या कारणास्तव विश्वासात घेऊन रमण चांडक यांना मोटारसायकलवरून पोपटखेड भागातील अज्ञातस्थळी नेले आणि अर्धवट बांधकाम झालेल्या स्लॅपवरील दगडावर जोरजोराने डोके आपटून गंभीर दुखापत करुन चांडक यांना जिवाने ठार मारले.अशी तक्रार मृतक चांडक यांचा पुतण्या संदीप किरणकुमार चांडक यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी दिली. फिर्यादीचा जबानी रिपोर्टवरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

अतिरिक्त जिल्हा व सत्र बी.एम. पाटील यांच्या न्यायालयात आरोपी गजानन साहेबराव रेळे याने जामीन अर्ज दाखल केला होता. यावर सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद केला की, आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून दोषारोपत्रामधे आरोपीने चांडक यांचा खुन केल्याचा साक्षीदारांच्या बयानावरुन दिसून येते. अकोला येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १८३ नुसार काही साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. काही साक्षीदारांनी खून होण्यापुर्वी मृतक व आरोपीला एकाच गाडीवर पोपटखेड रोडवर जातांना पाहिले आहे. त्यामुळे खूनासारख्या या गंभीर प्रकरणात आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पैशाच्या व्यवहारातुन गुन्हा झाल्यामुळे आरोपीला जामीन मिळाला आरोपीपासुन मृतकाच्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवीताला धोका निर्माण होवू शकतो. या प्रकरणामध्ये जन्मठेपेची व फाशीची शिक्षा प्रस्तावित आहे. सरकार पक्ष हा खटला जलद गतीने चालविण्यास तयार आहे. त्यामुळे वरील सर्व मुद्दे लक्षात घेता या आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद केला. उभय बाजूच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आरोपी गजानन रेळे याचा अर्ज नामंजूर केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!