Sunday, December 21, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात निष्पाप जीवाचा घेतला प्रशासनाने बळी ! लोकांमध्ये तीव्र संताप

अकोल्यात निष्पाप जीवाचा घेतला प्रशासनाने बळी ! लोकांमध्ये तीव्र संताप

अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने खुल्या गटारात एका निष्पाप जीवाचा बळी गेला. या घटनेनंतर शहरात रोष व्यक्त केला जात आहे. अकोला शहरातील टिळक मार्ग परिसरात भूमिगत गटाराचा एक भाग गेल्या अनेक महिन्यांपासून उघडाच पडून होता.नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.

आज शनिवारी सकाळपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान टिळक मार्गावरील खुल्या गटाराजवळून जाताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो थेट गटारात कोसळला. गटारात पावसामुळे पाणी तुडुंब भरल्याने त्या इसमाचा काहीच पत्ता लागला नाही. या घटनेनंतर महापालिका प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाला याचा फटका बसला.

या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा सवाल आहे की, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने गटाराचा भाग दुरुस्त केला नाही, त्याची जबाबदारी कोण घेणार? या घटनेमुळे पुन्हा एकदा अकोला महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वृत्त लिहिस्तोवर इसम आढळून आला नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!