अकोला दिव्य न्युज ब्युरो : आज प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून यात अकोला शहर व जिल्ह्यानेही भर घातली आहे. प्रदूषणाने जीवीताचा वाढलेला धोका लक्षात घेता गार्डन क्लब सारख्या पर्यावरणवादी संस्थांनी खुल्या जागांचा वापर वनश्री फुलविण्यासाठी करावा. जिल्हा यासाठी प्रशासन योग्य ते सहकार्य करणार असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. सुवर्ण जयंती साजरी करीत असलेले अकोला गार्डन क्लब आणि महाबीज, बुलढाणा अर्बन व गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमीच्या सहकार्याने खंडेलवाल भवनात आयोजित वार्षिक पुष्प प्रदर्शनी व पुष्प स्पर्धा उत्साहात प्रारंभ झाली.
या दोन दिवसीय प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.जिल्हाधिकारी कुंभार यांच्या अध्यक्षतेत व महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मंचावर गार्डन क्लबचे अध्यक्ष अजय सेंगर, सचिव शरद कोकाटे, सुधीर राठी, संजय शर्मा, देविदास निखाडे, महाबीजचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रफुल लहाने, गुजरात अंबुजाचे अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे उपस्थित होते. गणेश पूजन व दीप प्रज्वलनाने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कुंभार यांनी गार्डन क्लबच्या उपक्रमाची प्रशंसा करीत,अर्बन डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी महानगर हरित करण्यासाठी पुढाकार घेत युवाशक्तीला सहभागी करावे असे आवाहन केले. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी अकोल्यासारख्या शहरात ही अभिनव प्रदर्शनी नागरिकांसाठी उपयुक्त असून वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगितले. प्रास्ताविक गार्डन क्लबचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केले. सामूहिक प्रयत्नामुळेच 50 वर्षाचा हा टप्पा क्लब गाठू शकला असल्याचे सांगून उपस्थित जेष्ट सदस्य व क्लब पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा बहाल दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रीतसर उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात पन्नास वर्षीय कार्यकाळात क्लबला सेवा प्रदान करणारे क्लबचे माजी वयोवृद्ध पदाधिकारी डॉ नानासाहेब चौधरी, देवयानी चौधरी, देविदास निखाडे, गजानन कोंडोलीकर, ब्रिजमोहन मोदी, उद्धव ठाकरे, हनवाडीकर, सुदामापंत हिरुळकर, डॉ सुषमा गायकी, अशोक कुलकर्णी, केशव खांडेकर,वासुदेवराव खर्चे, डॉ सुभाष सावजी, डॉ पी.पी.देशमुख, डॉ कृष्णाराव सदावर्ते, अनंतराव कानिटकर, रेखा खंडेलवाल, श्रीमती पडगिलवार आदींचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून भावपूर्ण गौरव केला. तसेच या पुष्प प्रदर्शनीचे परीक्षक मुकुंद तिजारे, सुचिता खोडके, अनिल बोडे,किशोर बोबडे, डॉ शर्मिला किबे, छाया बोबडे, डॉ सुषमा गायकी, डॉ पल्लवी दिवेकर, जयेश जग्गड यांना सन्मानित करण्यात आले.संचालन प्रा शारदा बियाणी तर आभार शरद कोकाटे यांनी मानलेत.
आज रविवार दि 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता प्रदर्शनीच्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेत तथा बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी व डॉ नवनीत तिवारी यांच्या उपस्थितीत होत आहे.या मोफत प्रदर्शनीचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष अजय सेंगर, उपाध्यक्ष सुधीर राठी, संजय शर्मा, सचिव शरद कोकाटे, कोषाध्यक्ष जयप्रकाश पाटील, सहसचिव नरेश अग्रवाल, वैशाली पाटील, माजी अध्यक्ष विजय ढवळे, सहकोषाध्यक्ष श्याम गोटफोडे, दिनेश पारेख, चंदना जैन, ब्रिजमोहन चितलांगे, रवींद्र खंडेलवाल, आलोक खंडेलवाल, नीरज आवंडेकर, अनुराधा ढवळे, अर्चना सापधारे, कोकिळा पाटील, संजय पिंपळकर, पल्लवी दिवेकर, सुनील कवीश्वर, शामलाल तिबुडे, श्रीकांत कोंडोलीकर, सागर प्रधान, यु टी ठाकरे, निशीकांत बडगे, संजय हेडा, संजय आगाशे आदींनी केले.