Friday, January 3, 2025
Homeराजकारणउपोषण मागे ! मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ महिन्यांचा वेळ दिला

उपोषण मागे ! मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ महिन्यांचा वेळ दिला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. मात्र त्यांनी आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत देतो आहे असं सांगितलं आहे. तसंच उपोषण आपण मागे घेतलं असंही जाहीर केलं आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी भूमिका आता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. मराठा समाजाला दोन महिन्यात आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे मी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत देतो असं ते सुरुवातीला म्हणाले होते. मात्र नंतर त्यांनी दोन महिन्यांचा वेळ सरकारला दिला आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मात्र आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार हे देखील त्यांनी जाहीर केलं आहे.

दोन महिन्यांची मुदत सरकारने मागितली आहे. त्यांना ती द्यायची का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना विचारला. त्यानंतर २४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. २ जानेवारीपर्यंत वेळ द्यावा असं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ आणि निवृत्त वकिलांचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाली आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले आहेत. तसंच सरकारला मुदतही २४ डिसेंबपर्यंतच देणार असंही त्यांनी सांगितलं. पण नंतर त्यांनी दोन महिन्यांची मुदत सरकारला दिली आहे.

कुणालाही अर्धवट आरक्षण नको असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे आणि उदय सामंत यांनी २ जानेवारीपर्यंत मुदत द्यावी असा आग्रह धरला होता. तसंच आता जर दगा फटका केला तर मुंबई बंद करु असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मला आता रस्त्यावर उपोषण बंद करुन रस्त्यावर आंदोलन सुरु करावं लागेल असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी सगळ्या मराठा बांधवांशी चर्चा केली. आता जर दगाफटका केला तर मुंबईचं नाक बंद करु असाही इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!