अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भात ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख असलेल्या अकोला शहराची एम स्क्वेअर ट्युटोरियल्सने अत्यंत कमी काळात सनदी लेखापाल अभ्यासक्रमाचे कोचिंग देण्यात उंच भरारी घेतली आहे. केवळ विदर्भातील नव्हे तर मराठवाड्यातील विद्यार्थी सीए फाऊंडेशन आणि सीए इंटरमिडिएट कोचिंग करीता एम स्क्वेअर ट्युटोरियल्स प्राधान्य देत आहेत. विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या सीए फाऊंडेशन परिक्षेचा तयारीसाठी ६ एप्रिलपासून बॅच सुरू झाली आहे. तर वर्ष २०२६-२८ या कालावधीतील सीए फाउंडेशनच्या परिक्षेसाठी येत्या २५ मे २०२६ पासून नवीन बॅच सुरू होत आहे. यामध्ये देखील मोजक्या जागा शिल्लक आहेत.

एम स्क्वेअर ट्युटोरियल्सचे संचालक मयंक थानवींनी सुरू केलेल्या सीए अभ्यासक्रमाच्या कोचिंगसाठी नावाजलेले, विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेले CA सारथी सीए इंटरमिडिएटच्या अभ्यासक्रमाचे कोचिंग देणार आहेत.यासोबत ते सीए फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांच्या कोचिंगपासून कोचिंग क्लासेसची सुरुवात करणारे मंयक यांनी आज गरूडझेप घेतली आहे. शतप्रतिशत निकाल देण्यासाठी अथक मेहनत करून मयंक थानवी यांनी पालकांचा विश्वास आणि सहजसोप्या पध्दतीने कोचिंग देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत असल्याने विद्यार्थी देखील एम स्क्वेअर ट्युटोरियल्सला पहिली पसंती देत आहे.
इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत कोचिंग देण्यात हातखंडा बसल्यावर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच सुरू केली आणि येथेही विद्यार्थी १०० टक्के यश संपादन करू लागले. दरम्यान अनेक शिक्षक आणि कोचिंग क्षेत्रातील नामवंत ‘एम स्क्वेअर’ सोबत जोडले गेले. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांनी दरवर्षी निकालाचा आलेख उंचावत गेला. वाणिज्य विषयक अभ्यासाकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि पुढील शिक्षणाचे कोचिंग क्लास येथेच सुरू करण्यासाठी पालक सातत्याने मागणी करत होते. अखेर सीए सारथी यांच्यासह सीए अंकित अग्रवाल, सीए अक्षय शाह, तुषार निर्मल आणि अनिकेत चांडक व इतर कोचिंग तज्ज्ञ यांची सेवा घेऊन सीए फाऊंडेशन आणि सीए एंडरमिडिएटसाठी कोचिंग क्लासेस सुरू केले.

एकाच छताखाली इयत्ता पाचवी ते बारावी आणि त्यानंतर सीए फाऊंडेशन व एंटरमीडिएट पर्यंतचे शिक्षण देणारे एम स्क्वेअर ट्युटोरियल्स हे अकोलाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील पहिले केंद्र आहे. विशेष म्हणजे कोचिंग सोबतच विद्यार्थ्यांना मुल्यवर्धित शिक्षण आणि योग्य संस्कार देण्यासाठी याठिकाणी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. हे महत्त्वाचे आहे.
